यशोगाथा बचत गटाची; ‘माणगंगा’ मसाल्यांचा राज्यभरात तडका

उद्योजकतेचा विश्वास मिळताच अनेक महिलांनी बचत गटांतून कर्ज घेऊन स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय आणि आपले अस्तित्व निर्माण केले.
spices
spicessakal

बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे. प्रारंभी स्वतःच्या बचतीला प्राधान्य देत त्यांनी स्वतःची पत निर्माण केली. सामूहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले. त्यातून उद्योजकतेचा विश्वास मिळताच अनेक महिलांनी बचत गटांतून कर्ज घेऊन स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय आणि आपले अस्तित्व निर्माण केले. अशाच प्रकारे स्वतंत्र व्यवसाय उभारून स्वावलंबी झालेल्या गोंदवले बद्रुक येथील शीतल आणि साधना रणपिसे या माणगंगा मसाले उत्पादक नवउद्योजक महिलांची ही यशोगाथा...

spices
पुण्यात १० कोरोना मृत्यू; ७ हजार ७०८ नवे कोरोना रुग्ण

माण तालुका(man taluka) हा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पण, माण तालुक्याची ही एवढीच ओळख नाही तर येथील माणसं परिस्थितीशी झुंजणारी आहेत. येथील कष्टाळू माणदेशी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून मोठे यश मिळवले आहे. गोंदवले बुद्रुक येथील मुक्ताई बचत गटातील शीतल आणि साधना रणपिसे याही आता भरारी घेत आहेत. गोंदवले बुद्रुकमधील दहा महिलांनी एकत्र येऊन या बचत गटाची स्थापना करत सामूहिक व्यवसाय सुरू केला. त्यातील स्वतंत्र प्रज्ञेच्या शीतल रणपिसे यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. गटातीलच सदस्या साधना रणपिसे(sadhna ranpise) यांना त्यांनी बरोबर घेतले. दोघींनी बचत गटातून कर्ज घेतले आणि विविध प्रकारच्या मिरच्या, कांदे, लसूण आणि गरम मसाला (चटणी) करण्यासाठी लागणारे सर्व मसाले (लवंज, मिरी, दालचिनी आदी) विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

spices
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’

जातिवंत मिरची आणि दर्जेदार खडा मसाला असल्याने त्यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिक वर्षभराच्या तिखट मसाल्यासाठी मिरची मसाला नेतात, मग आपणच विविध प्रकारचे गरम मसाले तयार करून विकले तर नागरिकांची सोयही होईल आणि आपलाही व्यवसाय वाढेल, या विचाराने शीतल आणि साधना यांनी गरम मसाले तयार करण्यास सुरवात केली. त्यासाठी बचत गटातूनच कर्ज घेऊन मसाले बारीक करण्यासाठी ४० हजार रुपयांचे मशिन आणले. शीतल आणि साधना या अहोरात्र कष्ट करून गरम मसाला, गोडा मसाला, कांदा-लसूण चटणी, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, तिळ, जवस, कारळा चटणी, लसूण- खोबरे चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्या व चवदार गरम मसाले तयार करू लागल्या. त्याला आकर्षक पॅकिंगची जोड दिली. चवदार आणि खमंगपणामुळे त्यांच्या माणगंगा मसाले उत्पादनास खूप ग्राहक मिळाले. गावात आणि नजीकच्या मोठ्या गावांतही त्या विक्रीसाठी माल देऊ लागल्या.

गोंदवलेकर महाराज (gondvalekar maharaj)यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पुणे-मुंबईसह खूप दूरवरून भाविक येतात. ते आवर्जून आमचे मसाले नेतात, अशी माहिती शीतल रणपिसे यांनी दिली. आता त्या नागरिकांच्या मागणीप्रमाणेही गरम मसाला(Spices) तयार करून देत असून आम्ही आमच्या उद्योगातून कुटुंबाला बऱ्यापैकी आर्थिक मदत करू शकत आहोत, असे सांगणाऱ्या शीतल आणि साधना रणपिसे या बचत गट चळवळीला धन्यवाद देत आहेत.

spices
राज्यातील पाच हजार पक्ष्यांचे होणार टॅगिंग

शेतात कष्ट करणे एवढेच आमच्या हातात होते. कुटुंबाला चांगले दिवस यावेत, यासाठी काही तरी उद्योग(business) करणे गरजेचे होते. बचत गटाने आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळेच आम्ही माणगंगा मसाले हा उद्योग उभारू शकलो आहे.

- शीतल रणपिसे,

गोंदवले बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com