esakal | उदमांजरांच्या शिकारप्रकरणी ओंडचे दहा जण वन विभागाच्या जाळ्यात

बोलून बातमी शोधा

Crime News

उदमांजरांच्या शिकारप्रकरणी ओंडचे दहा जण वन विभागाच्या जाळ्यात

sakal_logo
By
विलास खबाले

विंग (जि. सातारा) : मालकी हद्दीच्या रानात शेड्युल दोनमधील दोन उदमांजरांची कुत्र्याच्या मदतीने शिकार करणाऱ्या 10 जणांच्या टोळीला वन विभागाने पाठलाग करून अटक केली. विंग परिसरातील रानात शिकार सुरू असताना वन विभागाने सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकून संबंधितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात शिकारी कुत्री, दोन खुरपी, शिकार केलेले उदमांजरही वन खात्याने जप्त केले आहे. अटक केलेले ओंडचे आहेत.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिकारप्रकरणी बबन बापू देशमुख, गणेश किसन पवार, बाळू काळू जाधव, पोपट आण्णा देशमुख, सुनील राजाराम देशमुख, अजय राजाराम देशमुख, शिवाजी बापू देशमुख, रघुनाथ आण्णा देशमुख, राजाराम बापू देशमुख व राहुल शिवाजी पवार (रा. सर्व रा. ओंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वन विभागाचे वनरक्षक रमेश जाधववर यांना विंगच्या मालकी हक्काच्या क्षेत्रात शिकार सुरू आहे, अशी माहिती काहींनी दिली. त्यानुसार जाधववर यांनी थेट वनमजूर अमल माने, भरत पवार यांना घेऊन विंग भागात गस्त घालण्यास सुरवात केली. काही काळ पाठलाग केल्यानंतर जाधववर व त्यांच्या पथकाला विंगमध्ये अनिल सुतार यांच्या विहिरीजवळ काही लोक शिकारी कुत्र्यांच्या मदतीने शिकार करत आहेत, असे आढळले.

गुड न्यूज! 'कराड जनता'च्या ठेवीदारांचे 329 कोटी जमा; 39 हजार ठेवीदारांना होणार 'लाभ'

त्यांनी त्यातील काहींना पकडले. त्यांच्याकडे मारलेल्या स्थितीतील दोन उदमांजर होते. त्यांच्याकडे दोन खुरपीही होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वनरक्षक जाधववर यांनी त्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास काळे यांना दिली. अन्य वरिष्ठांनाही त्यांनी माहिती दिली. जाधववर यांच्या मदतीला वनक्षेत्रपाल काळेंसह वनपाल ए. पी. सव्वाखंडे, नांदगावचे वनरक्षक अरुण सोळंकी पोचले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाठलाग करून शिकार करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी सरकारने बंदी घातलेल्या शेड्युल दोनमधील दोन उदमांजरांची शिकार केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे दहा ते बारा शिकारी कुत्र्यांसह हत्यारेही सापडली आहेत. शिकाऱ्यांना पकडून त्यांचे जबाब घेऊन उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

आज माझे लग्न आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रात डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'दीनदयाळ पुरस्कारा'ने सन्मान

'सेवेच्या ठायी आम्ही तत्पर'; संकटकाळात एसटी चालक बनणार 'वायुदूत'

'केस मिटवून घ्या, नाही तर कोर्टात या'; कोरोनाच्या महामारीत 'बहुरुपी' अडचणीत