चाळीसगाव येथे दुधाचा ट्रॅंकर उलटविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

13 शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; अमळनेरला क्रांती कृती समितीतर्फे रास्तारोको
जळगावः शेतकरी संपाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात देखील पडसाद उमटू लागले आहेत. सकाळपासून शांतता असताना दुपारनंतर मात्र किसान क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास लागले आहेत. यात चाळीसगाव येथून मुंबईकडे रवाना झालेला दुधाचा ट्रॅंकर उलटवून टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आला. तर अमळनेर येथे क्रांती कृती समितीतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

शेतीमालाला हमीभाव द्यावा, कर्जमाफी मिळावी, पेंशन लागू करावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून संप पुकारला आहे. या संपाचे पडसात जळगाव जिल्ह्यात उमटू लागले आहे. यात नेहमी गजबजणारी चाळीसगाव बाजार समितीमध्ये सकाळपासून शुकशुकाट होता. एक देखील शेतकरी माल विक्रीसाठी घेवून आला नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तसेच दुपारी चाळीसगाव शहरातील अपेक्षा डेअरी येथून दुधाने भरलेले ट्रॅंकर मुंबईला रवाना झाल्यानंतर ट्रॅंकर शहराच्या बाहेर गेल्यावर शेतकऱ्यांनी ट्रॅंकर रोखून उलटविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी व्हॉल्व उघडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ट्रॅंकर चालकाने पोलिसांना फोन करून सदर घटनेची माहिती दिल्यानंतर आंदोलन करणाऱ्या 13 शेतकऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अमळनेर येथे दुपारी किसान क्रांती मोर्चातर्फे बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: jalgaon news chalisgaon farmer strike and milk tanker