जळगावः कुष्ठरोग विभाग सहसंचालक असलेल्या डॉक्‍टरचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जळगाव : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. डॉ. अरविंद सुपडू मोरे असे या अधिकाऱ्याचे नाव असून महिनाभरापूर्वीच त्यांनी जळगावी पदभार स्वीकारला होता.

डॉ. मोरे शहरातील पार्वतीनगर भागात ए. आर. पाटील यांच्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहायचे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांचा वाहनचालक जालिम जाधव त्यांना घेण्यासाठी गेले असता खोलीत डॉ. मोरेंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला. चालकाने लगेचच खालीच राहत असलेल्या घरमालकांना व रामानंद पोलिसांत घटनेची माहिती दिली. पाइप कापण्याचे हेक्‍सॉ ब्लेड घटनास्थळी पडले होते. रात्रीतून त्यांची कुणीतरी हत्त्या केली की, त्यांनी स्वत:चा गळा चिरत आत्महत्या केली याबाबत अद्याप संभ्रम आहे. रामानंदनगर ठाण्याचे पोलिस अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खून की आत्महत्या याबाबत आताच सांगता येणार नाही, असेही सिंह यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: jalgaon news The doctor's suspicious death