Dhule News : युवकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले दागिने महिलेस केले परत..!

Javed Patel returning the lost jewelery to Mangalbai Thorat.
Javed Patel returning the lost jewelery to Mangalbai Thorat. esakal

Dhule News : सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड असलेली पर्स युवकाला सापडली. त्याने ती जपून ठेवली. बोराडी (ता. शिरपूर) येथील उपसरपंच राहुल रंधे यांनी संबंधित महिलेचा शोध लावला.

तिला दागिन्यांची पर्स परत करण्यात आली. युवकाचा बोराडी गावातर्फे सत्कार करण्यात आला. (jewels found by youth were returned to woman dhule news)

ठाणे येथील रहिवासी मंगलबाई भरत थोरात कामानिमित्त बोराडी येथील गौतम यांच्याकडे निघाल्या होत्या. येथील बसस्थानकातून शिरपूर-दुर्बड्या बसमधून त्या जात असताना त्यांच्या हातातील पर्स बसमध्ये पडली. मात्र ती बाब श्रीमती थोरात यांच्या लक्षात आली नाही.

त्याच बसमधून वाडी (ता. शिरपूर) येथील जावेद सलीम पटेलदेखील प्रवास करीत होते. त्यांना पर्स आढळली. मात्र तिच्या मालकाविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी ती जपून ठेवली. घरी येऊन बघितल्यावर पर्समध्ये मंगलपोत, कर्णभूषणे, पाच हजारांची रोकड व काही कागदपत्रे असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Javed Patel returning the lost jewelery to Mangalbai Thorat.
Nashik Crime: धक्कादायक! कामाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे बळजबरी लग्न लावून दिले, सत्य समोर आले तेव्हा...

ही बाब त्यांनी वाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांना सांगितली. त्यांनी तातडीने बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. रंधे यांनी मित्रांमार्फत शोध घेतला. त्यात हरवलेली पर्स व दागिने मंगलबाई थोरात यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवारी (ता. ६) बोराडी येथील श्रीराम मंदिर देवस्थान परिसरात वाडी येथून आलेले जावेद पटेल व भरत भिल यांनी मंगलबाई थोरात यांना पर्स परत केली.

आपले सर्व दागिने व रोकड सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त करीत पटेल यांचे आभार मानले. बोराडी ग्रामस्थांतर्फे राहुल रंधे व पदाधिकाऱ्यांनी जावेद पटेल यांचा सत्कार केला.

Javed Patel returning the lost jewelery to Mangalbai Thorat.
District Health Center : जि. प. आरोग्याच्या 4 कोटीतून जिल्ह्यात आरोग्य केंद्र दुरुस्तीचा घाट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com