Encrochment News : नाल्यातील अतिक्रमणांवर अखेर ‘बुलडोजर'; महापालिकेची कारवाई

On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.
On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.esakal

Dhule News : शहरातील विविध नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा प्रकार होतो. यामुळेच मागील वर्षी शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. यावरून महापालिका प्रशासनावर मोठी टिकाही झाली.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने अखेर नाल्यातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यास सुरवात केली. (Municipal action Encroachment in Sushi Canal in Devpur area Bulldozer finally on the encroachment in drain Dhule News)

सोमवारी (ता. २९) शहराच्या देवपूर भागातील सुशी नाल्यात अखेर बुलडोझर उतरविण्यात आले. पोलिस बंदोबस्तात नाल्यातील अतिक्रमित घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईसह अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. महापालिका स्तरावरुनही याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. काही दिवसांपासून शहरातील नालेसफाईचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

दरम्यान, नाला काठावरील अतिक्रमणेही टप्प्याटप्प्याने काढण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, या कारवाईला मुहूर्त कधी मिळणार याची प्रतीक्षा होती. सोमवारी अखेर देवपूर भागातील सुशी नाल्यात महापालिकेने कारवाईसाठी जेसीबी उतरवला.

On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.
Dhule News : कचरा ठेका वाद; आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची उच्चस्तरीय चौकशी करा

सकाळी अकराच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नाल्यातील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वीच महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले.

पथकाने पोलिस बंदोबस्तात सुमारे दहा ते बारा अतिक्रमित घरे जमीनदोस्त केल्याची माहिती मिळाली. कारवाईदरम्यान, काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून घरावरील पत्रे व इतर साहित्य काढून घेतले.

या कारवाईदरम्यान सुशी नाला पुलावर बघ्यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, ही कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.
Dhule News : बाजारापेक्षा किरकोळ विक्रीत भाव खातेय भुईमूग शेंग

थेट नाल्यात घरे

शहरातील विविध भागात नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. अनेक ठिकाणी नाले अरुंद झाल्याने या नाल्यांना गटारींचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी नालेच गडप झाल्याचेही पाहायला मिळते.

दरम्यान, सुशी नाल्यावरील अतिक्रमणेही अशाच पद्धतीने झाली आहेत. विशेष म्हणजे नाल्याच्या अगदी मधोमधदेखील घरे असल्याचे चित्र सहज नजरेस पडते.

त्यामुळे अशा अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई का होत नाही, असाही प्रश्‍न नागरिकांना पडतो. शेवटी या अतिक्रमणांवर कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे.

On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.
Dhule News : दुकानांच्या भाडे शुल्कापोटी 1 कोटी 42 लाख वसुली

ठपक्याचा इफेक्ट?

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये धुळे शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक कॉलन्यांमध्ये पाणी शिरले होते. नाला काठावरील वस्त्यांमध्ये तर घरात पाणी शिरल्याने संबंधित कुटुंबांचे मोठे नुकसानही झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरातील ही पूरस्थिती पाहता महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, अतिक्रमण निर्मूलन न केल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता.

त्यावरून महापालिका प्रशासनाची मोठी नाचक्की झाली होती. मागील वर्षातील या परिस्थितीमुळे यंदा महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्याचे दिसते.

On Monday, the encroachment removal department of the Municipal Corporation moved a bulldozer on the encroachment in Sushi Nalla area of ​​Devpur area.
Jalgaon News : महापालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; फुले मार्केटमध्ये लोखंडी रॅक जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com