नाशिक: येवल्यात शेतीमाल फेकला रस्त्यावर

संतोष विंचू
गुरुवार, 1 जून 2017

मालेगाव-कोपरगाव राज्यमहामार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर सकाळपासून हजारांवर शेतकरी जमा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करत होते. अन्नधान्य व फळे भाजीपाला रस्त्यावर ओतण्यास सुरवात शेतकऱ्यांकडून झाली.

येवला - शेतकरी संपावर गेला असून, येवला टोल नाक्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांतून माल खाली ओतला. तसेच येवला, नगरसूल, सायगाव येथे हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतले. सायगाव येथे माधव भंडारी यांचा पुतळा तसेच कर्जवसुलीच्या नोटिसा जाळल्या व रास्ता रोको करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली.

मालेगाव-कोपरगाव राज्यमहामार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर सकाळपासून हजारांवर शेतकरी जमा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करत होते. अन्नधान्य व फळे भाजीपाला रस्त्यावर ओतण्यास सुरवात शेतकऱ्यांकडून झाली. आगोदर आंबे वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील आंबे रस्त्यावर फेकल्यानंतर लिंबू, टोमॅटो, लसूण यांच्यासह गहू, तांदूळ, डाळी, साखर, साबण, बिस्किटपुडे, तेलडबे, गोडतेल यांच्या गाड्यातून माल काढीत अक्षरक्षः रस्त्यावर फेकला. टोलनाक्यावरील रस्त्यावर अन्नधान्याचा चिखल झाला होता अन् हाच चिखल तुडवत इतर प्रवासी गाड्या नाईलाजाने ये-जा करीत होत्या.

याच दरम्यान सकाळी येथे गोमांस असलेला टेम्पो पकडण्यात आला. या टेम्पोलाही आग लावण्यात येऊन टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी हवाली करण्यात आला. संप करीत रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन गोडेतेलाचे टँकर रस्त्यावर ओतून दिले. तर तेलाचे टिनचे डब्बे वाहणाऱ्या दोन ट्रकमधून तेल डब्बे काढीत रस्त्यावर ओतून दिले. या दरम्यान शालेय पोषण आहार पुरवणारे दोन टेम्पोमधील माल रस्त्यावर ओतून दिला. एका आश्रमात चाललेला गहू असलेल्या ट्रकमधील गहू तर दोनतीन ट्रकमधील लसून, पाच ते दहा आंब्याच्या ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर अर्धा ते पाऊण किलोमिटर पर्यंत अन्नधान्याचा चिखल दिसून येत होता. पोलिसांची संख्या अत्यंत कमी व जमाव हिंसक होत असल्याने पोलिस प्रशासनही हतबल झाले होते. पोलिसांनी संपकऱ्यांना अडवले असता तुरळक दगडफेक सुरु झाली. जवळ रेल्वे लाईन असल्याने दगड व खडीचे प्रमाण जास्त तसेच संख्याबळ कमी असल्याने पोलिसांना नमते घेत अधिक बंदोबस्ताची वाट पहावी लागली. पोलिस उप-अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी वरिष्ठांना परिस्थितीची कल्पना देऊन अतिरिक्त पोलिस बळाची मागणी केली होती. परंतू सकाळी साडेअकरापर्यंत पोलिसांची अधिक कुमक आलेली नव्हती.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: nashik news #farmerstrike in yevla