Nashik D Pharmacy Admission : डी.फार्मसीच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

D. Pharmacy Admission
D. Pharmacy Admissionesakal

Nashik D Pharmacy Admission : इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी.फार्मसी प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने सध्या गुणवत्ता यादी प्रसिद्धी करण्यापर्यंतचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी. फार्मसीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया १२ जूनपासून सुरु झालेली आहे. (Deadline for registration of D Pharmacy till 3rd July nashik news)

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना पहिल्‍या टप्यांत संकेतस्‍थळावर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीची पद्धतीची निवड करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

११ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ५ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीशी निगडित तक्रारी, हरकती नोंदविण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिली जाईल. यानंतर ११ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल. महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याचे प्रवेशफेरीनिहाय वेळापत्रक येत्‍या काळात प्रसिद्ध केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

D. Pharmacy Admission
Pharmacy Education: राज्यात विनाअनुदान तत्वावरील फार्मसीच्या 600 जागांना मान्यता

तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत असणार आहे.

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर जुलैच्‍या दुसऱ्या आठवड्यापासून प्रवेश फेरीच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल.

डिप्‍लोमा अर्जाची ३० पर्यंत मुदतवाढ

इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन येथे उपलब्‍ध असलेल्‍या पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रम प्रवेशाला मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार आता पात्र विद्यार्थी येत्‍या ३० जूनपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीचा पर्याय निवडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. प्रक्रियेच्‍या पुढील टप्यांत ३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. ४ व ५ जुलैदरम्‍यान हरकती, तक्रार नोंदविण्याची मुदत असेल. ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे.

D. Pharmacy Admission
D. Pharmacy: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! यंदा डी-फार्मसीला विभागातून ६ हजार ७२० जागा भरणार; तब्बाल १११ कॉलेजमध्ये प्रवेश चालू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com