Scholarship News : परदेशात उच्च शिक्षणासाठी, शिष्यवृत्तीसाठी या तारखेपर्यंत मुदत

Government Scholarship
Government Scholarshipesakal

Scholarship News : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ऑनलाइन अर्ज भरून आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. (Deadline for scholarship is up to 12 july nashik news)

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. टाइम्स हायर एज्‍युकेशन किंवा क्‍यूएस क्रमवारीत दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, औषधनिर्माणशास्‍त्र व वास्तुकलाशास्‍त्र शाखांसाठी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेटसाठी प्रत्येकी एक, अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्‍त्र शिक्षणक्रमासाठी एकूण आठ विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ दिला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Government Scholarship
JEE NEET Exam Training : खुशखबर! आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोफत जेईई, नीट प्रशिक्षण...

नाशिक विभागातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काही अडचणी असल्यास त्यांनी सामनगाव रोडवरील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय येथील समन्वयक डॉ. जयंत गजानन जोशी यांच्‍याशी संपर्क साधावा.

शिष्यवृत्ती योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ आदींच्‍या माहिती, कार्यपद्धतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.foreignscholarship2023.dtemahrastra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा.

Government Scholarship
Nashik News : लेखी आदेशाची प्रतीक्षा; जी-पॅटचा निकाल रखडल्‍याने विद्यार्थी संशोधनाला मुकणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com