Nashik News : आई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांना जानोरीकरांचा 'असा' दणका! ग्रामसभेकडून ठराव

Villagers attending Gram Sabha.
Villagers attending Gram Sabha. village

Nashik News : आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांबाबात जानोरी (ता. दिंडोरी) ग्रामपंचायतीने कठोर निर्णय घेत त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

अशा मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले देण्यात येणार नाहीत तसेच शासकीय योजनांचाही लाभ मिळणार नाही, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

सामाजिक जाणीव आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून असा निर्णय घेणारी जानोरी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. (no benefit of certificates and schemes from Gram Panchayat to those who do not take care of their parents nashik news)

सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. सध्या आई-वडिलांचा सांभाळ न करणे, वयोवृद्ध माता-पित्यांची देखभाल न करणे आणि प्रसंगी त्यांना दमदाटी करून मालमत्ता हिसकावून घेणे असे प्रकार सर्रास घडत आहेत.

गावातही अशा काही घटना घडत असल्याचे पदाधिकाऱ्यांना समजले. तसेच काही महिलांनीही याबाबत तक्रारी केल्या. अशा मुलांना चांगलीच अद्दल घडायला हवी, अशी भूमिका काही ज्येष्ठांनी मांडली.

नेमका हाच धागा पकडून ग्रामसभेत यावर चर्चा घडवून आणण्यात आली, अशा मुलांविरोधात ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीतर्फे कोणतेही शासकीय दाखले देण्यात येऊ नये तसेच विविध शासकीय योजनांचा लाभही त्यांना देऊ नये, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

जानोरी गावातील देशी दारू दुकान गावठाणाच्या बाहेर स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी गावातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers attending Gram Sabha.
Leopard : कोंबड्याची शिकार करायला गेला बिबट्या अन् स्वत:च खुराड्यात कैद झाला

गावांतर्गत रस्ते, वाडी-वस्तीवरील पथदीप बसविणे, गावपाट दुरुस्ती करणे, गावची लोकसंख्या जास्त असल्याने पाणीपुरवठ्याच्या टाकीची साठवण क्षमता कमी पडत असल्याने विभागानुसार पाण्याच्या साठवणुकीसाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य उपकेंद्र एकजवळील बंधारा दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. गावातील सर्व सरकारी गटांची मोजणी करून सरकारी गटांतील अतिक्रमण काढण्याबाबत ठराव करण्यात आला.

स्वातंत्र्या दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असून, त्याचे बक्षीस वितरण १५ ऑगस्टला होणार आहे. तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्शल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारिका केंग, विश्‍वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, ज्ञानेश्‍वर विधाते, भारत काठे, दीपक काठे, काळू तुंबडे, रमेश जाधव, नाना डंबाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Villagers attending Gram Sabha.
Nashik News : 'या' महामार्गावर प्रवासापासून रोखले 4500 हजारांपेक्षा जास्त वाहनांना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com