Nashik News : गिरणा पंपिंगसाठी हवा सोलर प्रकल्प! वीजबिल वाचणार

 solar
solaresakal

Nashik News : मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात गिरणा व चणकापूर या दोन धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरासाठी चणकापूरला १ हजार ८०० तर गिरणा धरणात ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. मात्र पाणीपुरवठा, पंपिंग व शुद्धीकरणासाठी मनपाचे दरमहा सव्वा कोटी रुपये वीज बिलावर खर्च होतात. (solar panel project want for girna pumping dam nashik news)

येथील गिरणा पंपिंगसाठी अडीच मेगावॅटचा सोलर प्रकल्प मार्गी लागल्यास दरमहा ७५ लाखाची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी गिरणा धरण परिसरात दहा एकर जागा आणि निधीची उपलब्धता झाल्यास मालेगाव महापालिकेचा आर्थिक भार हलका होऊन पाणीपुरवठ्यातही सुसूत्रता येईल.

मनपा प्रशासन व शहरवासीयांनी या प्रकल्पाचे फायदे व गरज ओळखून प्रकल्पासाठी जनमताचा रेटा लावला पाहिजे. या प्रकल्पासाठी पाटबंधारे विभागाकडून गिरणा धरण परिसरातील दहा एकर जमीन मनपाला उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वजन वापरायला हवे.

गिरणा धरणातील पाणी लिफ्ट करून उचलावे लागत असल्याने गिरणा पंपिंगचे दरमहा ८१ ते ८५ लाख रुपये वीजबिल येते. येथे पाणीपुरवठ्यासाठी ३३ केव्ही क्षमतेचे स्वतंत्र एक्सप्रेस फिडर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा विस्कळित होतो. याउलट चणकापूरचे पाणी नैसर्गिक न्यायाने उताराने नदी व पाटकालव्याद्वारे तळवाडे तलावात व तेथून जलवाहिनीने जलशुद्धीकरण केंद्रात येते.

चणकापूरचे पाणी शुध्द, स्वच्छ व नैसर्गिक जाणवते. त्या तुलनेत गिरणा धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असते. यामुळे पाणी शुद्धीकरण करतानाही काळजी घ्यावी लागते. दोन्ही धरणातील पाणी एकत्र शुद्धीकरण करून पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याला बाधा पोहोचत नाही.

 solar
Nashik News: जिल्ह्यात कमी पटसंख्या असलेल्या 142 शाळा; सिन्नर व येवला तालुक्यातील शाळा सर्वाधिक

गिरणाचे पाणी उचलण्यासाठी वीज खर्च मोठा असताना चणकापूरच्या पाण्यासाठी वहन लॉसेस जास्त आहेत. चणकापूर धरणातून साडेचारशे दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यास तळवाडे तलावात ९० दशलक्ष घनफूट पाणी येते. चणकापूर ते ठेंगोडा बंधारा नदीत पाणी पाझरते. ठेंगोडा बंधारा ते तळवाडे तलाव पाटकालव्याद्वारे काही पाणी वाया जाते.

पाणी चोरी होते. दोन्ही धरणातील आरक्षित पाणी मनपा पूर्ण क्षमतेने उचलत नाही. मनपाला वीज बिलाबरोबरच पाण्याच्या वार्षिक देखभाल, दुरुस्ती, साठवणूक व पाणीपट्टी हा खर्च देखील आहे. खर्चात बचत केल्यास व सोलर प्रकल्प झाल्यास हा सुमारे एक कोटीचा निधी अन्य विकास कामांसाठी उपयोगात येईल.

दहा एकर जागेचा प्रश्न

मनपाने सोलर प्रकल्पासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. शासनाने तो मराठवाडा विकास महामंडळाकडे पाठविला. तेथून प्रस्ताव जळगावला आला. जळगाव येथील पाटबंधारे अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव कोणी सादर केला आहे का? कोणाला जागा दिली आहे का? याची माहिती द्या.

असे कारण देऊन प्रलंबित ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी गिरणा धरण परिसरात उपलब्ध असलेली दहा एकर जमीन मिळविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी वजन वापरण्याची ही वेळ आहे.

 solar
Nashik News: अखेर 18.22 कोटींचा जिल्हा टंचाई कृती आरखडा सादर; जिल्हा प्रशासनाकडून मान्यतेची प्रतीक्षा

३५ कोटींचा खर्च अपेक्षित

सध्या गिरणा पंपिंग स्टेशनवर पाचशे अश्‍वशक्तीचे आठ वीजपंप आहेत. एका पंपासाठी ३७५ किलोवॅट वीज पुरवठा आवश्‍यक असतो. एकूण सुमारे २ हजार २५० किलोवॅट वीज पुरवठा घ्यावा लागतो. हा हिशेब पाहता मनपाच्या सोलर प्रकल्पासाठी अंदाजे अडीच मेगावॉटचा वीज प्रकल्प हवा.

या प्रकल्पासाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च आहे. वीज बिलाचा हिशेब पाहता अवघ्या तीन वर्षात ही रक्कम वसूल होऊ शकते. प्रसंगी एखादी मोठी कंपनी व संस्था या प्रकल्पात गुंतवणूक करून नाममात्र भाडे आकारून मनपाला हा प्रोजेक्ट उभा करून देऊ शकते.

 solar
Nashik News: गंगापूरचा विसर्ग थांबला; 0.5 टीएमसी पाणी सोडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com