भंडारा: पवनीमध्ये 'ग्रीन डे सेलीब्रेशन' चे आयोजन

शाहिद अली
बुधवार, 5 जुलै 2017

या कार्यक्रमला तहसिलदार गजानन कोकुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, प्राचार्य अशोक माथुरकर, न. प. सदस्य राकेश बिसने यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते व विद्यार्थ्यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आणि शपथ घेण्यात आली. 

भंडारा : जिल्ह्यातील पवनी येथे सकाळ समुहातर्फे 'ग्रीन डे सेलीब्रेशन' चे आयोजन येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज (बुधवार) करण्यात आले.

या कार्यक्रमला तहसिलदार गजानन कोकुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, प्राचार्य अशोक माथुरकर, न. प. सदस्य राकेश बिसने यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते व विद्यार्थ्यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आणि शपथ घेण्यात आली. 

तहसिलदार यांनी वृक्ष लागवडसह संवर्धन करण्याची गरज आहे सकाळ समुहातर्फे नेहमी सामाजिक उद्देशने केलेले कार्य समाजसाठी पेरणादेणारी आहे. कमलाकर रायपुरकर यांनी रोपे लावणे सोपे आहे आता त्याची जोपसना करून विद्यार्थ्यांनी त्याला वृक्ष बनविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन या प्रसंगी व्यक्त केले.

या वेळी विद्यार्थी व मान्यवरांनी सकाळ ग्रीन डे ची शपथ घेतली व तहसीलदार गजानन कोकुड्डे यांचे हस्ते मुख्याध्यापक अशोक माथुरकर यांना सकाळ ग्रीन डे सन्मानपत्र देण्यात आले.

सकाळ ग्रीन डे साठी वनविभागाचे वनक्षेत्रधिकारी बी. एस. बाराई यांनी रोप उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाला विकास हायस्कूलचे शिक्षक ए. ऐ. रघुते, बी. ऐ. रंधे, ऐ. ऐस. वैदय, ऐ. एन. आकरे व कु. ऐ. सी.मेश्राम यांनी सह सहकार्य केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​

Web Title: Bhandara news tree plantation in pavni