कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 100 रूपयांचे अनुदान मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

• मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी
• शेतकऱ्यांनी बँकेचा तपशील तात्काळ बाजार समिती कार्यालयात सादर करावा

बुलडाणा: सहकार विभागाच्या 3 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रूपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचेकडील कांदा जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा येथे विक्री केलेला आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना सदर अनुदान मंजूर झाले आहे.

ही रक्कम थेट पात्र शेतकरी यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्र शेतकरी यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व आधार क्रमांक आदी तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा करावा. जेणेकरून अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे शक्य होईल. तरी सदर पात्र कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेचा तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: buldhana news Grant of Onion Growers for Farmers