उदयनराजें बद्दल आक्षेपार्ह विधान; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

खामगाव (बुलढाणा): साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबात फेसबुकवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने आक्षेपार्ह प्रतिक्रिया लिहिल्याने भोसले यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

खामगाव (बुलढाणा): साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबात फेसबुकवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने आक्षेपार्ह प्रतिक्रिया लिहिल्याने भोसले यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत सुरु असलेल्या प्रकरणी समर्थक रस्त्यावर उतरल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखावल्याची पोस्ट फेसबुकवर आली होती. त्या पोस्टवर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ओम शर्मा यांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया केल्याने खामगाव येथील उदयनराजे समर्थकांनी रोष व्यक्त करत शिवजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओम शर्मा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले, माजी नगराध्यक्ष गणेश माने सह नगरसेवक प्रवीण कदम, रवी महाले, संजय धोरण यांच्यासह उदयनराजे समर्थक आदी पोलिस स्टेशन जमा झाले होते.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: buldhana news mp udayanraje bhosale facebook bjp corporator compaint