ठाण्यातील एलपीजी टॅंकर हटवण्यासाठी आणखी सहा तासांची प्रतिक्षा

श्रीकांत सावंत
सोमवार, 3 जुलै 2017

ठाणे: ठाण्यातील काजूपाडा परिसरात आज (सोमवार) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उलटलेला एलपीजी गॅसने भरलेला टॅंकर हटवण्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यानंतरही यश मिळाले नाही. उलटलेला टॅंकरमधून मोठ्याप्रमाणामध्ये गॅस गळती सुरू झाल्यामुळे हा टॅंकर हटवण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे: ठाण्यातील काजूपाडा परिसरात आज (सोमवार) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उलटलेला एलपीजी गॅसने भरलेला टॅंकर हटवण्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यानंतरही यश मिळाले नाही. उलटलेला टॅंकरमधून मोठ्याप्रमाणामध्ये गॅस गळती सुरू झाल्यामुळे हा टॅंकर हटवण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे, मिरा-भाईंदर आणि भारतगॅसचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहचून टॅंकर हटवण्याच्या कामास सुरूवात केली आहे. हा टॅंकर हटवण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची आवश्यका असल्यामुळे अशा तज्ज्ञांचे पथक थोडावेळापुर्वी घटनास्थळी दाखल झाले आहे. हा टॅंकर हटवण्यासाठी आणखी पाच ते सहा तास लागणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन ठाण्यातून दहिरस, कांदिवली या पश्चिम उपनगरांकडील वाहतुक ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावरून पवईमार्गे वळवली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतुक भिवंडी बायपासकडून कशेळी काल्हेर मार्गे वळवण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतुक पोलीसांकडून देण्यात आली.  

मध्यरात्रीपर्यंत काम पुर्ण होण्याची शक्यता...
टॅंकरमधून होणाऱ्या वायुगळतीमुळे या भागातून हा टॅंकर हटवण्यासाठी अडचणी येत असून त्यावर मात करून हे काम पुर्ण करण्यासाठी आणखी पाच ते सहा तास लागण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी या भागामध्ये काम करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून हे काम मध्यरात्रीनंतरही सुरूच राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतुक पोलीसांकडून करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: thane news tanker accident and traffic jam