Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 September 2019

मुक्या प्राण्यांच्या शर्यतीला कायद्यानं बंदी आहे तरीदेखील आपल्या हौसेपायी शर्यती लावल्या जातात.

मुक्या प्राण्यांच्या शर्यतीला कायद्यानं बंदी आहे तरीदेखील आपल्या हौसेपायी शर्यती लावल्या जातात. डांबरी रस्त्यावर रेड्याला गाडीला जुंपून शर्यत लावली होती. रेड्याला जुंपल्यानंतर आपलीच गाडी पुढे पळावी म्हणून प्रत्येकजण गाडी पळवत होता. रेडेही वेगानं पळत होते. पण, डांबरी रस्ता असल्यानं रेड्याचे पाय घसरत होते...तरीदेखील गाडी चालक रेड्याला मारून मारून उधळवत होता. 

बाईकच्या वेगानं रेडा पळवत होता. रेडा पळावा म्हणून बाईकवरून लोक जोरजोरात आरडाओरड करत होते. सगळ्यांनाच पुढे जायचंय म्हणून गाडी चालक वेगानं गाडी पळवत होते. पण, त्याचवेळी वेगानं धावत असलेल्या या रेड्याचा वेग वाढला आणि रेडा सैरावैरा पळू लागला. रस्ता सोडून रेडा गाडी घेऊन बाहेर गेला. पण, रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडवर गाडीचं चाक चढलं आणि गाडी एका बाजूला कलंडली आणि गाडीवर बसलेले चौघेहीजण खाली कोसळले. हीच संधी साधून रेड्यानं पळ काढला...

गाडीचं चाक डिवायडरवर चढल्यानं गाडी एका बाजूला कलंडली. या घटनेत गाडीवर बसलेले चौघेहीजण गंभीर जखमी झाले. हा व्हिडीओ पंजाबमधील असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आपल्या हौसेपायी मुक्या प्राण्यांना असा त्रास देणं योग्य नाही. त्यामुळं अशा शर्यतींचं आयोजन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

***************************************************************

आणखी वाचा  :

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya video buffalo race