रिलायन्स आणणार 500 रूपयात 4जी फोन

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

रिलायन्स जिओचा प्रमुख व्यवसाय डेटा आणि बॅन्डविड्थचा आहे. स्मार्टफोन बनविणे हा काही कंपनीचा व्यवसाय नाही. मात्र, स्वस्त 4जी फोनमुळे आणखी ग्राहक रिलायन्स जिओकडे आकर्षित होतील, असा कंपनीला विश्वास आहे.

मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल इंडस्ट्रीजकडे वळवला आहे. रिलायन्स लवकरच फक्त 500 रुपयांमध्ये 4 जी फोन बाजारात आणण्याची तयारी करतो आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स चालू महिन्यात 4 जी फोन सादर करण्याची शक्यता आहे. येत्या 21 जुलै रिलायन्स इंडस्ट्रीजच्या होणार्‍या वार्षिक बैठकीदरम्यान रिलायन्स 4 जी फोन सादर करेल असे बोलले जात आहे. 84 दिवसांची वैधता असलेल्या 'जिओ'ची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या 'धन धना धन' प्लॅनसह हा फोन सादर होण्याची शक्यता आहे.

एचएसबीसीचे संचालक आणि दूरसंचार विश्लेषक राजीव शर्मा यांनी दिलेल्या अहवालानुसार, 500 रुपयात 4 जी मोबाईल फोन देऊन रिलायन्स 2 जी यूजर्सला 4 जी मोबाईलशी जोडू पाहत आहे. त्यामुळे जिओच्या 4 जी वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जिओ प्रत्येक मोबाईल मागे 1000 रुपये अनुदान देण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओचा प्रमुख व्यवसाय डेटा आणि बॅन्डविड्थचा आहे. स्मार्टफोन बनविणे हा काही कंपनीचा व्यवसाय नाही. मात्र, स्वस्त 4जी फोनमुळे आणखी ग्राहक रिलायन्स जिओकडे आकर्षित होतील, असा कंपनीला विश्वास आहे. स्वस्त फोन प्रामुख्याने निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या सोयीसाठी असेल. निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक केवळ स्वस्त डेटासाठी नवा फोन विकत घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे, हातात असलेल्या फोनच्या डेटा स्पीडवर ते काम चालवू शकतील. त्यांना रिलायन्स जिओकडे वळवायचे असेल, तर स्वस्त 4जी फोन हाच मार्ग रिलायन्ससमोर आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​