दहा रूपयाच्या राखीसाठी 'तिने' घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

  • बेळगावात रक्षा बंधनदिवशी हृदयद्रावक घटना
  • भावाला राखी बांधण्याचे तिचे स्वप्न अधुरेच

  • बेळगावात रक्षा बंधनदिवशी हृदयद्रावक घटना
  • भावाला राखी बांधण्याचे तिचे स्वप्न अधुरेच

बेळगाव: ते दोघे एकाच गल्लीत राहणारे.... तीन वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला... नव्याचे नऊ दिवस संपले अन्‌ पती-पत्नीत भांडणे सुरू झाली. आज रक्षाबंधन... भावाला राखी बांधायला जाण्याचे तिचे स्वप्न.... तिने नवऱ्याकडे राखीसाठी अवघे दहा रूपये मागितले. परंतु, त्याने देण्यास नकार दिला... यातूनच भांडण वाढत गेले.... नवरा तणतणतच घराबाहेर पडला.... अन्‌ भावाला दहा रूपयांची राखीही खरेदी करू शकत नाही..., हीच गोष्ट तिने मनाला लावून घेतली अन्‌ चक्क तिने मृत्यूला कवटाळले.

भाऊ-बहिणीच्या पवित्र रक्षाबंधनदिवशीच विवाहितेने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याने वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महादेवी अशोक गोल्लर (23, रा. वड्डर छावणी मलप्रभानगर, वडगाव बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

अशोक गोल्लर समाजाचा तर महादेवी वडर समाजाची. दोघेही याच परिसरात राहणारे. त्यामुळे त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर तीन वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केले. भंगार व्यवसाय करणाऱ्या अशोकला दारूचे व्यसन लागले अन्‌ यातूनच पती-पत्नीचे खटके उडू लागले.

राखीसाठी भांडण
प्रभानगर येथेच महादेवीचे माहेर. आज सकाळी ती उठली अन्‌ तिच्या लक्षात आले की आज रक्षाबंधन. प्रेमविवाहामुळे दोन्ही कुटुबांत थोडासा तणाव आहे. परंतु, भावाला राखी बांधून हा तणाव कमी करता येईल, असा विचार महादेवीने केला. आज तिने पतीकडे राखीसाठी दहा रूपये मागितले. परंतु, सदैव नशेत असणाऱ्या अशोकने तिला पैसे देण्यास नकार दिला. यातूनच दोघांचे भांडण जुंपले. ते विकोपाला गेले की शिवीगाळ करत अन्‌ तणतणतच अशोक घराबाहेर पडला. यानंतर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या महादेवीने घरातील हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शहापूरचे सहायक उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा व अन्य पोलीस सोपस्कार पूर्ण होणे बाकी असल्याने घटनेची अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

Web Title: belgaum news rakhi pournami sister suicide