गोवाः कांदोळी समुद्रात अहमदाबादच्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

विलास महाडिक
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पणजी (गोवा): कांदोळी समुद्रात आज (गुरुवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेल्या अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे विद्यार्थी असलेल्या सहापैकी त्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज सकाळी समुद्रकिनाऱ्याला लागले.

पणजी (गोवा): कांदोळी समुद्रात आज (गुरुवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेल्या अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे विद्यार्थी असलेल्या सहापैकी त्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज सकाळी समुद्रकिनाऱ्याला लागले.

बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अनुजा सुसान पॉल (23, चेन्नई) व गुर्रम चेंचू साई (25) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 47 विद्यार्थ्यांचा गट गोव्यात काल कांदोळी येथे आला होता. त्यातील सहाजण आज पहाटे 3.30 च्या सुमारास कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. ते समुद्रात उतरले व काही वेळातच एक तरुणी व एक तरुण एका लाटेबरोबर आत समुद्रात ओढले गेले. अनुजा पॉल हिचा मृतदेह काही वेळातच समुद्रकिनाऱ्यावर लाटेबरोबर बाहेर आला तर गुर्रम साई याचा मृतदेह सकाळी 9 वाजता समुद्रकिनाऱ्यावर आला. कळंगुट पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉ इस्पितळाच्या शवागारात पाठविले आहेत. मृत झालेल्या कुटुंबियांना कळविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे पहाटेच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेल्या हिमाचल प्रदेश येथील आयटी क्षेत्रातील अशत्रय दत्ता (27) या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. तो सुद्धा आपल्या मित्रांसमेवत मौजमजा करण्यास गोव्यात आला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)