गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी; आंदोलनाला सुरुवात

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

शेती उत्पादनांचे कमी झालेले भाव आणि इतर मुद्यांमुळे अस्वस्थ झालेले गुजरातमधील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.

अहमदाबाद (गुजरात) : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर आता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून आंदोलनाला सुरुवात केली असून जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

क्षत्रिय ठाकोर सेनेच्या वतीने कर्जमाफीच्या मागणीसाठी हजारो लिटर दूध एका महामार्गावर फेकून देण्यात आले. अल्पेश ठाकोर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. ठाकोर यांनी अलिकडेच शेतकरी त्यांचे दूध डेअरींना न विकता रस्त्यावर फेकून देणार असल्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दूध फेकण्यापासून रोखले. मात्र त्यामध्ये प्रशासनाला यश मिळाले नाही. याबाबत बोलताना ठाकोर म्हणाले, 'सध्या आम्ही संपूर्ण गुजरातमध्ये दोन दिवसांसाठी दूधावर बंदी आणली आहे. त्यांनतर आम्ही गांधी आश्रमापासून गांधी नगरपर्यंत रॅली काढणार आहोत. त्यानंतरही जर सरकारला जाग आली नाही, तर 8, 9 आणि 10 जुलैपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जातील. त्यामध्ये राज्यभरातील शेतकरी सहभागी असतील.'

'जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण देशाला माहिती आहे की गुजरातमधील शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे सामर्थ्य आहे', अशा शब्दांत ठाकोर यांनी सरकारला इशाराही दिला. शेती उत्पादनांचे कमी झालेले भाव आणि इतर मुद्यांमुळे अस्वस्थ झालेले गुजरातमधील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​