...तर 2019 साली भाजपचा 'खेळ खल्लास' होईल: लालूप्रसाद यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्ये झालेल्या गोंधळाला काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर लालू यादव यांनी विरोधी पक्ष एकत्र आणण्याबाबतचे वक्तव्य केले आहे.

पाटना (बिहार) - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांनी जोरदार निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती एकत्र आल्या तर 2019 सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा खेळ खल्लास होईल, असे म्हणत लालू यादव यांनी भाजपवर टीका केली आहे.

लालू यादव एका सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष मायावतीजी, अखिलेशजी, रॉबर्ट वद्राजी, प्रियंका गांधीजी, ममता दीदी किंवा लालू यादव किंवा त्यांचे कुटुंबिय यांना तोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. कारण त्यांना आमची ताकद माहिती आहे आणि त्यांना हे ही माहिती आहे की सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर 2019 साली पुन्हा सरकार स्थापन करण्याचे भाजपचे केवळ स्वप्न बनून राहील.' 'जर मायावती आणि अखिलेश एकत्र आले तर पुढील निवडणूकीत भाजपला संधी मिळणार नाही', असेही लालू यादव पुढे म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्ये झालेल्या गोंधळाला काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर लालू यादव यांनी विरोधी पक्ष एकत्र आणण्याबाबतचे वक्तव्य केले आहे.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​