भोर-महाड रस्ता वाहतुकीसाठी खुला; दरड हटविली

Bhor-Mahad road is open for vehicle
Bhor-Mahad road is open for vehicle

महाड - भोर मार्गावर वाघजई घाटात उंबर्डे गावाजवळ कोसळलेली दरड हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 23 जूनला दुपारी दीड वाजता ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाक़डून जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्यात आली.

दरड कोसळल्याने महाड-भोर मार्गे होणारी एस.टी. आणि अन्य वाहतूक ताम्हिणी तसेच महाबळेश्वर मार्गे वळविण्यात आली होती. महाड-भोर मार्गावर वाघजई तसेच वरंध घाटात पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळत असतात. पुणे, भोर, पंढरपूरकडे जाण्यासाठी या मार्गावरुन अनेक लहानमोठ्या वाहनांची वर्दळ सुरु असते. जोरदार पावसाला अद्याप सुरुवात झाली नसली तरीही या मार्गावरील वाघजई घाटात 23 जूनला दुपारी दीड वाजता दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दरड कोसळल्याची माहिती एका एस.टी. बस चालकाने महाड परिवहन स्थानकात दिली. महाड आगाराने महाड बांधकाम विभागाला ही माहिती दिली.

या घाटात असलेले महाड बांधकाम विभागाचे मजूर घटनास्थळी दाखल झाले. परंतु दरड मोठी असुन दरड कोसळलेला भाग भोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याने भोर येथून यंत्रसामुग्री आल्यानंतर ही दरड हटविण्याचे काम सुरु झाले. सायंकाळी सातपर्यंत येथील वाहतूक ठप्प होती. महाड आगारातून पुण्याला या मार्गे जाणारी एस. टी. वाहतूक ताम्हिणी तसेच महाबळेश्वरमार्गे वळविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com