#स्पर्धापरीक्षा - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट' 

टीम ई सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दि. 4 ऑक्‍टोबर 2016 रोजी "वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक - ऑक्‍टोबर 2016' हा अहवाल केला असून 2016 सालात जागतिक अर्थव्यवस्था 3.1 टक्के दराने तर 2017 साली 3.4 टक्केने वाढणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील मंदीची स्थिती, उत्पादनांच्या मागणीतील घट या कारणामुळे भविष्यकाळातही विकास दर कमीच राहण्याची शक्‍यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

या अहवालातील अन्य ठळक बाबी पुढीलप्रमाणे 

  • 2016 सालात विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील वृद्धीदर 1.6 टक्केच्या जवळपास राहणार आहे. 2015 साली हा दर 2% टक्के होता. यापूर्वी जुलै 2010 मधील अंदाजानुसार आर्थिक वृद्धीदर 1.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. 
  • 2017 साली अमेरिकेचा वृद्धीदर 2.2 टक्के राहणार आहे तर "ब्रेक्‍झिट'मुळे ब्रिटनचा वृद्धी दर 2016 व 2017 सालात अनुक्रमे 1.8 व 1.1 टक्के राहण्याची शक्‍यता आहे. 
  • युरोपियन युनियनचा 2015 मधील वृद्धीदर 2 टक्के नोंदविण्यात आला असून 2016 व 2017 या वर्षात हा दर अनुक्रमे 1.7 व 1.5 टक्केपर्यंत कमी येण्याची शक्‍यता आहे. 
  • जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानचा वृद्धीदर 2016 व 2017 साली अनुक्रमे 0.5 व 0.6 टक्के राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 
  • गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच विकसनशील अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीदरात वाढ होण्याची शक्‍यता असून 2016 व 2017 या वर्षी या अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर अंदाजे 4.2 टक्के व 4.6 टक्के असेल. 
  • सब सहारन आफ्रिकेतील देशांची स्थिती बिकट असून 2016 च्या अखेरपर्यंत नायजेरियाची अर्थव्यवस्था 1.7 टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज आहे. 
  • दक्षिण अमेरिकेतील देशांच्याही अर्थव्यवस्थेत मंदीचेच वातावरण असून 2016 व 2017 या वर्षात व्हेनेझुएलाचा वृद्धी दर -10 टक्के आणि -4.5 टक्के एवढा असेल तर याच दोन वर्षात ब्राझीलची अर्थव्यवस्थाही ऋणात्मक वाढ दर्शविण्याची शक्‍यता आहे. 
  • या पार्श्‍वभूमीवर आशियाई अर्थव्यवस्थांची स्थिती तुलनेने बळकट असल्याचे दिसून येते. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 2016 व 2017 साली 7.6 टक्के या स्थिर दराने वाढ होणे अपेक्षित असून या काळात जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था असणार आहे. 
  • मात्र त्याचवेळी हा वृद्धीदर कायम राखण्यासाठी भारताने करप्रणालीतील सुधारणा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतास दिला आहे. 
  • 2016 व 2017 सालात चीनच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अनुक्रमे 6.6 व 6.2 टक्के असण्याची शक्‍यता आहे. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - गंगा नदी

#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना