कुलस्वामिनीमध्ये चमकतोय गोंडस आर्यन मेघजी

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनी या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनं मालिकेच्याकथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कुलस्वामिनी; मालिकेत आरोही देवधरकुटुंबात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या या प्रयत्नांना कुटुंबातूनच विरोध होत आहे.सुवर्णा, साक्षी आणि श्रेया आरोहीच्या प्रयत्नांना खिळ घालत आहेत. त्या तिला काही ना काही कारस्थानंकरून त्रासही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, छोटा मयूर या कुटुंबात दाखल होतो आणि आरोहीच्या बाजूनेउभा राहतो.

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनी या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनं मालिकेच्याकथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कुलस्वामिनी; मालिकेत आरोही देवधरकुटुंबात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या या प्रयत्नांना कुटुंबातूनच विरोध होत आहे.सुवर्णा, साक्षी आणि श्रेया आरोहीच्या प्रयत्नांना खिळ घालत आहेत. त्या तिला काही ना काही कारस्थानंकरून त्रासही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, छोटा मयूर या कुटुंबात दाखल होतो आणि आरोहीच्या बाजूनेउभा राहतो.

अनेक जाहिराती आणि मालिकांमध्ये चमकलेला आर्यन मेघजी हा बालकलाकार आरोहीच्या मानलेल्या भावाची भूमिका साकारत आहे. आर्यननं आजवरच्या कामातून उत्तम अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता तो आरोहीच्या भावाची भूमिका किती प्रभावी करतो, त्याच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कोणतं वेगळं वळण घेणार, हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल. ८ वर्षीय आर्यनच्या एंत्रीमुळे कुलस्वामीनी सेटवरचे वातावरण अधिक खेळकर झालं आहे. 
 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :