रिक्षाने कट मारल्याने डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने एका मृत्यू

नितीन टेकाळे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना घेऊन येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

वाशी : रिक्षाने कट मारल्यामुळे झालेल्या बाचाबाचीतून डोक्यात लोखंडी रॉड मारल्यामुळे एकजण मरण पावला. सरमकुंडी (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) ते रामकुंड रस्त्यावर बुधवारी (ता. 6) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सहभागी एका महिलेसह दोघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

रामकुंड येथून सरमकुंडी फाट्याकडे बुधवारी रात्री एक रिक्षा (क्रमांक एम.एच. २३ एच ७९०४) भरधाव वेगाने येत होता. या रिक्षाला हेडलाईट नव्हते. या रिक्षाने याच रस्त्याने जात असलेल्या संतोष विनायक डोंबाळे (वय २७ रा. वंजारवाडी, ता. भूम) यांच्यासह अन्य दोघांना  कट मारला. यातून रिक्षाचालक अशोक रामभाऊ लोखंडे (रा. सरमकुंडी, ता. वाशी)  व त्या तीन नागरिकामध्ये बाचाबाची झाली.

रिक्षात असलेल्या नकुला रंगनाथ चंदनशिवे (रा. रामकुंड ता. भूम) यांनी संतोष यांचा शर्ट पकडला व रिक्षाचालक अशोक रामभाऊ लोखंडे याने संतोषच्या डोक्यात लोखंडी गज मारला. यामुळे संतोष डोंबाळे हे बेशुद्ध पडले. वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना घेऊन येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षाचालक अशोक लोखंडे यास अटक केली आहे. या घटनेतील दुसरी आरोपी महिला नकुला चंदनशिवे फरार आहे. फौजदार मोतीराम बागड तपास करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)