भिवंडीतील नायब तहसीलदारांच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दीपक हिरे
बुधवार, 5 जुलै 2017

वज्रेश्वरी (भिवंडी): शासनाचा गौण खनिजाचा महसूल कर बुडवून रेतीमाफीयांना मदत करणारे भिवंडीचे निवासी नायाब तहसिलदार संदीप आवारी यांची चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी भिवंडीचे उपविभागिय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांना दिल्याने महसूल विभाग अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी निवासी नायब तहसीलदार संदीप आवारी यांनी वाळू माफियांना पाठीशी घालत अवैध वाहतूक करणारे वाळूने भरलेले दोन ट्रक उपविभागिय अधिकारयांनी कुठलाही लेखी आदेश दिलेला नसतानाही आवारी यांनी परस्पर सोडले होते. यासंबंधी आदिवासी महादेवकोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनिष भोईर यांनी जिल्हाधिका-याकडे लेखी तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीची दाखल घेत ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी यासंबंधी भिवंडीचे डॉ. थिटे यांना चौकाशीचे आदेश दिल्यानंतर प्रांत अधिका-यांनी भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात आवारी यांच्याकडून खुलासा मागितला आहे.

दरम्यान, शासनाचा कर बुडवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना पोटाशी घालणे भिवंडीचे निवासी नायब तहसीलदार यांना चांगलेच अंगाशी आले असून, हे प्रकरण आवारी यांना चांगलेच भोवणार असल्याची चर्चा सुद्न्य नागरिक करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​