बँकेवर दरोड्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद; 6 तासांत आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

आरोपींपैकी रोहित मोरे हा सराईत गुन्हेगार असून, दिल्लीमध्ये चार वर्षे त्याने यापूर्वी शिक्षासुद्धा भोगली आहे.

नवी मुंबई : बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. खारघर सेक्टर 30 येथील कॅनरा बँकेत तीनजणांनी हा चोरीचा प्रयत्न केला होता. ही 14 सप्टेंबरच्या रात्रीची घटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दोघेजण बँकेच्या बाहेर थांबले होते. तर एकाने बँकेच्या आतमध्ये चोरी करण्यासाठी बँकेचे शटर तोडून बँकेत प्रवेश केला. लॉकर उघडता न आल्याने चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे बँकेतील सीसीटीव्हीचे डीव्हीआर घेऊन पसार झाले. खारघर पोलिसांनी अवघ्या 6 तासांत केली आरोपींना अटक केली. तिघे आरोपी 20 वर्ष ते 22 वर्ष वयोगटातील आहेत. 

मुकेश केसव आडे (20), रोहित रवींद्र मोरे (22), इरशाद अली हासन मन्सुरी (22) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी रोहित मोरे हा सराईत गुन्हेगार असून, दिल्लीमध्ये चार वर्षे त्याने यापूर्वी शिक्षासुद्धा भोगली आहे. आरोपींकडून सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त करण्यात आले. चोर सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाले आहेत. आरोपींना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :