बेळगाव महापालिकेत प्रथमच वाजविले 'नाडगीत'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आहे. त्यामुळे आजवर कधीही बैठकीच्या आधी नाडगीत म्हटले किंवा वाजविले गेले नाही. पण शनिवारी जिल्हाधिकारी व प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आधी नाडगीत वाजविण्यात आले.

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती निवडणूकीच्या बैठकीच्या आधी नाडगीत वाजविण्यात आले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आहे. त्यामुळे आजवर कधीही बैठकीच्या आधी नाडगीत म्हटले किंवा वाजविले गेले नाही. पण शनिवारी जिल्हाधिकारी व प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आधी नाडगीत वाजविण्यात आले. बैठकीआधी नाडगीत व बैठकीच्या समारोपावेळी राष्ट्रगीत म्हणण्याचा नवा आदेश शासनाने बजावल्याचेही यावेळी जयराम यानी सांगितले.

बैठकीच्या अध्यक्षांच्या या निर्णयाचा आदर ठेवून सर्व नगरसेवक नाडगीतसाठी उभे राहिले. पण नाडगीतच्या या सक्तीबाबत मराठी नगरसेवकानी मात्र नाराजी व्यक्त केली. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ही यावेळी व्यक्त करण्यात आली. नाडगीत संदर्भात आदेश आला आहे का? अशी विचारणा कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे केली असता तसा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याचे त्या म्हणाल्या. यासंदर्भात सत्ताधारी गटाचे नगरसेवक व अर्थ स्थायी समिती अध्यक्ष रतन मासेकर यांच्याकडे विचारणा केली असता नाडगीत बाबत शासनाचा आदेश आल्याचे ते म्हणाले. शासकीय आदेश आला असेल तर यापुढे महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण बैठकीत नाडगीत वाजविले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शासनाचा हा आदेश नेमका कधी बजावण्यात आला आहे याबाबत अद्याप जिल्हाधिकारी व कौन्सिल विभागाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. याआधी शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये नाडगीत म्हणने सक्तीचे केले आहे. शाळा सुरू होण्याआधी दररोज नाडगीत म्हटले जाते. सीमाभागातील मराठी शाळांमध्ये नाडगीत म्हणण्याची विशेष सक्ती केली जाते. यामुळे मराठी विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. नाडगीत हे कर्नाटकाचे गुणगाण करणारे गीत आहे. सीमाभागातील मराठी भाषिक 1956 पासून महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत आहेत तर सीमाभागात कन्नसक्ती करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न कर्नाटकाकडून सुरू आहेत. अपवाद वगळता बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांचीच सत्ता आहे. आधी महापालिकेच्या कामकाजाचे कानडीकरण करण्यात आले. आता मराठी नगरसेवकांना डिवचण्यासाठी नाडगीत वाजविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवू'
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​