राष्ट्रीय महार्गावरील देखभाल दुरूस्ती कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद

सचिन शिंदे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

या दुरूस्तीचे कंत्राट अनेक वर्षांपासून जयहिंद रोड बिल्डरकडे आहे.

कऱ्हाड - राष्ट्रीय महार्गावरील देखभाल दुरूस्ती कर्मचारी आजपासून कामबंद अंदोलनावर गेले आहेत. येथील  ढेबेवाडी फाटा येथील उड्डाणपूलाखाली घोषणा देत  ठिय्या मारून विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला.

शेंद्रे ते कागल या अडीशे किलोमीटरच्या महामार्गाची देखभाल दुरूस्ती  ते करतात. तेच कर्मचारी संपावर गेल्याने देखभाल दुरूस्ती व गस्त बंद पडली आहे. या दुरूस्तीचे कंत्राट अनेक वर्षांपासून जयहिंद रोड बिल्डरकडे आहे. या पट्ट्यात शेंद्रे ते मलकापूर , मलकापूर ते किणी व किणी ते कागल अशा  तीन सेक्शनमध्ये कामाची विभागणी आहे. या तिन्ही विभागात गस्त पथक, रूग्णवाहीका व देखभाल दुरूस्ती अशा वेगवेगळ्या विभागात सुमारे आडीशे ते तीनशे कर्मचारी रोजनदारीवर काम करत आहेत.

संबंधित कंपनीने कर्मचाऱ्यांना अन्यायकारक वागणूक देणे , बारा बारा तास ड्युटी करायला लावणे , वेळेत पगार न देणेासह अनेक प्रकार केले आहेत.त्या विरोधात सेक्शन तीन शेंद्रे ते कागल  पट्ट्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोसन सुरू केले. त्यांनी येथील ढेबेवाडी फाटा उड्डाणपूलाखाली मागण्यांबाबत घोषणा देत ठिय्या मारला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :