कंत्राटी बस चालकांच्या संपानंतर मुंढेंकडून कंत्राटच रद्द

कंत्राटी बस चालकांच्या संपानंतर मुंढेंकडून कंत्राटच रद्द
कंत्राटी बस चालकांच्या संपानंतर मुंढेंकडून कंत्राटच रद्द

पुणेः पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांचे बस चालक थकीत वेतनासाठी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, असे असताना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रसन्ना पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे.

पीएमपीने सार्वजनिक वाहतुकीसाठी भाडेतत्वावर काही खासगी बस चालवते. त्यामध्ये प्रसन्न पर्पल या खाजगी संस्थेच्या २०० बसेस रोज रस्त्यावर धावतात. या बसचे चालक आज (मंगळवार) नियमित वेतन मिळत नसल्याचे कारण देत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत मुंढे म्हणाले, पर्पलने सर्व बस दररोज चालवल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे रोखून धरले. म्हणूनच हा संप घडवून आणला आहे, असा आरोप मुंढे यांच्याकडून करण्यात आला आहे.

पीएमपी आणि प्रसन्न पर्पल यांच्यात झालेल्या करारानुसार पगारासह बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र, प्रसन्न पर्पल कराराचे पालन करीत नाही, यामुळेच मागील २ महिन्यांपासून चालकांचे पगार झालेले नाहीत. याचा परिपाक संपात झाला आहे. कोथरूडमधील साधारण २०० पीएमपी बसेसचे चालक संपावर आहेत.

ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com