धुळे : केव्हा कराल कर्जमाफी; मागण्यांसाठी रास्ता रोको

जगन्नाथ पाटील
बुधवार, 26 जुलै 2017

पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी महामार्गावर रास्ता रोके करीत असतांना शेतर्‍यांना मार्गदर्शन केले. शासनविरोधी विविध भूमिका मांडण्यात आल्यात. शासन विरोधी घोषणाही शेतकर्‍यांनी दिल्या.

कापडणे (जि.धुळे) : शेतकरी, शेत मजूरांना दहा हजार पेन्शन मिळायला पाहिजे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळायला पाहिजे. शेती मालाला भाव पाहिजे. शेतीची वीजबील माफी सरसकट मिळायला हवी. वीज भारनियमन बंद करणे अनिवार्यच आहे. कांद्याला हमी भाव हवाच आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने (ता.धुळे) फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. हिरालाल परदेशी, राज्य सदस्य साहेबराव पाटील, पोपटराव चौधरी, हिरालाल सापे, संतोष पाटील, गुलाबराव पाटील, वसंत पाटील, अर्जुन कोळी, महेश माळी, हेमंत सुर्यवंशी, मनोहर माळी, गोकुळ माळी, रवींद्र माळी आदी उपस्थित होते. मंडळाधिकारी डी.आर. ठाकूर व सहाय्यक पोलिस उपनिरक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी महामार्गावर रास्ता रोके करीत असतांना शेतर्‍यांना मार्गदर्शन केले. शासनविरोधी विविध भूमिका मांडण्यात आल्यात. शासन विरोधी घोषणाही शेतकर्‍यांनी दिल्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :