सोनगीर परिसरात पावसाने ओढ दिल्याने मत्स्य व्यावसायिक चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सोनगीर (जि. धुळे): येथे व परिसरात पावसाने ओढ दिल्याने लागोपाठ तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. धरणे व तलाव न भरल्याने पाणी टंचाईसह मासेमारी ठप्प आहे. गेल्या वर्षी व्यवसायीकांनी मत्स्यबीज सोडलेच नव्हते. यंदाही तीच स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस येईल व धरणे भरतील ही आशा मावळली आहे.

येथे पाझर तलाव, बाभळे (ता. शिंदखेडा) जवळील जामफळ धरण, डोंगरगाव (ता.शिंदखेडा) येथील सोनवद लघु प्रकल्प, देवभाने (ता.धुळे ) येथील धरण, बुरझड (ता.धुळे) येथील सातपायरी धरण आहे.

येथील पाझर तलावातून दररोज सरासरी एक क्विंटल मासे मिळतात. पावसाअभावी तलावाचे स्रोत आटले. मासेमारी पूर्णत: ठप्प झाली. जामफळ धरणात दररोज सुमारे  दोन क्विंटल मासे मिळत होते. सध्या धरण कोरडे आहे. गेल्यावर्षी मत्स्यबीज सोडले नव्हते. सोनवद धरणात चार लाख मत्स्यबीज सोडले होते. दररोज सुमारे दीड क्विंटल मासे मिळायचे. गेल्यावर्षी धरणात मृत साठा होता. म्हणून येथील कालिका मच्छीमार सोसायटीने मत्स्यबीज सोडले नव्हते. त्यामुळे येथेही दोन वर्षांपासून मासेमारी ठप्प आहे, असे अध्यक्ष दीपक लक्ष्मण भोई यांनी सांगितले.

देवभाने धरणाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. बुरझड परिसरात शेवटचा पाऊस ब-यापैकी झाल्याने सातपायरी धरणात  सुमारे 50 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले होते. गेल्यावर्षी दररोज अत्यल्प 30 ते 40 किलो मासे मिळत होते. यंदा तेही मिळणे दुरापास्त आहे. परिसरासाठी दररोज आठ ते दहा क्विंटल मासे आवश्यक आहेत.
मासेमारी सुरू असतांना देखील मासे पुरत नाहीत. पाच-सहा क्विंटल रोहू जातीचे मासे हैदराबादहून तर समुद्री बाम मुंबईहून धुळे व तेथून परिसरात आणतात. परिसरातील धरणात मिळणारे कटला, आफ्रिका, बोली, कोंबडा मासे, ओले बोंबील, वाव ही चवदार मासळी मिळत नसल्याने खवय्यांना बाहेरील बर्फात आणलेल्या माशांवर अवलंबून राहावे लागत आहे. मासेमारी ठप्प असल्याने परिसरातील सुमारे शंभर मासेमारांना बेकारीला तोंड द्यावे लागत असून काहींनी मिळेल ते काम स्विकारले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

    Web Title: dhule news rain and Fishery In Business Concerns