अमळनेर शिक्षण मंडळाची बेकायदेशीर 18 दुकाने होणार जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अमळनेर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने धुळे रोडवरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाची 18 बेकायदेशीर दुकाने पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

शैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधली म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर 26 जुलै रोजी न्यायालयाने ही दुकाने पाडण्याचे आदेश दिले होते. नगरपरिषदेने 18 पर्यंत दुकाने पाडन्याविषयी नोटीस दिल्या होत्या. 18 रोजी सकाळीच साडेसात वाजता नगरपरिषदेणे 2 जेसीबी मशीनसह दुकाने पडण्यास सुरुवात केली.

यावेळी मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे, संजय चौधरी, बांधकाम अभियंता प्रवीण जोंधळे, संजय पाटील, युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, दिलीप सर्जे शेखर देशमुख, महेश जोशी, अविनाश संदनशिव, ज्ञानेश्वर संदनशिव, प्रसाद शर्मा,  ए पी आय ढोबळे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश मोरे, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. विलास महाजन, यांच्यासह अग्निशामक दल, रुग्णवाहिका आर.सी.पी. प्लाटून 11 पोलिस 2 महिला पोलिस उपस्थित आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :