esakal | शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे 17 कोटी रुपये

बोलून बातमी शोधा

Akola Agriculture News Farmers will get Rs 17 crore for damage caused by untimely rains}

जिल्ह्यात  फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये ११ हजार २२२ हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जिल्हाप्रशासनाने सादर केला होता.

शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे 17 कोटी रुपये
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात  फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये ११ हजार २२२ हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जिल्हाप्रशासनाने सादर केला होता.

त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांची मदत मंगळवार ता.२३ रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल.

हेही वाचा - बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप


गतवर्षी जिल्ह्यात जिरायती व बागायती पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला.त्यातच गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला यामध्ये जिरायती तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर झाडांची पडझड,बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते.त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.दरम्यान १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून सदर निधीचे विभाजन करुन ते तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आल्यानंतर प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा - जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

असा आहे तालुकानिहाय मदतनिधी
तालुका रक्कम
अकोला २ कोटी ६ लाख ९८ हजार
बार्शीटाकळी १८ हजार
अकोट ९कोटी ३५ लाख १८ हजार
तेल्हारा २ लाख ४८ हजार
बाळापूर ३ कोटी ४३ लाख ८१ हजार
मूर्तिजापूर २ कोटी ५४ लाख ५४ हजार
..................................
एकूण १७ कोटी ४३ लाख १९ हजार

अशी मिळणार मदत!
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी मिळालेल्या निधीची रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.मिळणारी रक्कम ही बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार तर बागायती पिकांसाठी १३ हजार पाचशे तर जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे राहील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तालुका प्रशासनाकडे तयार आहेत.त्यामुळे लवकरच मदत खात्यात जमा होणार आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

0

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण