
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहीलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत येत्या शनिवारी (ता. 23) होत आहे .यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे.
बुलडाणा : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहीलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत येत्या शनिवारी (ता. 23) होत आहे .यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे.
महानायक कादंबरीकार,जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बुलडाणा अर्बनचे सिईओ डाँ.सुकेश झंवर स्वागतअध्यक्ष तर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उद् घाटक राहणार आहेत.
हेही वाचा - अकोल्याच्या गल्ली बोळांत आढळली इतिहासातील सोनेरी पानं!
सकाळी नऊ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक ) या ठिकाणाहून ग्रंथदिंडी ला सुरुवात होईल. जयस्तंभ चौक स्थित भारतीय स्वतंत्रता स्मारक व आद्य क्रांतिकारीका ताराबाई शिंदे येथे अभिवादन करून वाजत गाजत दिंड्या पताका यांच्या समवेत ग्रंथदिंडी संमेलनस्थळी जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य शहीनाताई पठाण, जयसिंगराजे देशमुख, सुनील सपकाळ, प्रा. अनंत शिरसाठ, नरेंद्र लांजेवार, डॉ. गणेश गायकवाड, गणेश निकम, कडुबा बनसोडे, सुरेश साबळे,शशिकांत इंगळे आदी साहित्यिक सहभागी होतील. या ग्रंथदिंडीचे नियोजन सुरेखाताई निकाळजे, जगदीशचंद्र पाटील, हभप गजानन महाराज गायकवाड,शाहीर खांडेभराड व जगदेव महाराज यांच्याकडे राहणार आहे.
हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू
दहा वाजता साहित्य संमेलनाचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे हस्ते उद् घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे सीईओ डॉ. सुकेश झंवर असून आमदार संजय गायकवाड, संपादक पुरुषोत्तम आवारे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, नगराध्यक्षा नजमुनिसा बेगम मो. सज्जाद, जयश्रीताई शेळके, शाहीनताई पठाण , यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प्रास्ताविक अँड. सतिशचंद्र रोठे, सूत्रसंचालन रणजीतसिंग राजपूत, आभार श्रीकृष्ण भगत व स्वागतगीत शाहीर बाबूशिंग राजपूत कला मंचसादर करणार आहे
पहिला परिसंवाद शेतकरी कायदेआणि वर्तमान या विषयावर आहे. परिसंवादामध्ये ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे, आमदार श्वेता महाले, रविकांत तुपकर, पुरुषोत्तम गावंडे, अशोकराव सोनोवने, अविनाश काकडे, गजानन अंहमदाबादकर, दिनकर दाभाडे, अॅड.. हरीश रावळ आदि सहभागी होणार आहे. संचलन पत्रकार गणेश निकम तर आभार प्रदर्शन राम हिंगे हे करतील.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
दुपारी दोन वाजता भोजन अवकाश असेल .दरम्यानच्या काळात शाहीर डी. आर. इंगळे व कला संचाचा संस्कृतीक कार्यक्रम देखील आयोजित केला आहे.
तीन वाजता पुढील परिसंवादाला सुरुवात होईल. नेताजींच्या विचारांची आज आवश्यकता या परिसंवादात बरोमासकार सदानंद देशमुख, इतिहासकार चंद्रशेखर शिखरे, प्रा. अनंत शिरसाठ, आनंद मांजरखेडे आदी सहभागी होत आहे. अतिथी राधेश्याम चांडक आहेत. या परिसवादानंतर कथाकथन आहे.
हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
समारोपीय सत्राचे अध्यक्ष संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व ठरावांचे वाचन होईल. नाट्य कलावंत शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला फेम राजकुमार तांगडे, खासदार प्रतापराव जाधव, गजानन दादा पाटील, आमदार राजेश एकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते ,डेप्टी सिइओ राजेश लोखंडे, वृषालीताई बोंद्रे अतिथी आहेत.
संचालन नरेंद्र लांजेवार करतील. त्यानंतर रात्री कवी संमेलनाचे आयोजन आहे. प्रसिद्ध शायर डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवि संमेलनामध्ये राज्यातील, जिल्हयातील कवी सहभागी होत आहे. तसेच कार्यक्रमस्थळी कवी नवोदित कवींसाठी एक दिवसीय कट्ट्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाभरातून येणारे नवोदित कवी यांना या कवी कट्टया मध्ये स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
राजेश साळवे हे कवी कट्ट्याचे अध्यक्ष असून नंदकुमार बोरबळे यांच्याकडे संचलन व नियोजनाची जबाबदारी आहे. एकूणच राज्यस्तरीय नेतांजी जागर साहित्य संमेलनासाठी स्वर्गीय भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे .साहित्यिकांची मांदियाळी आणि वैचारिक मेजवानीने ही नगरी दुमदुमून जाणार आहे .या साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य संयोजक तथा आयोजक सतीशचंद्र रोठे, संजय एन्डोले, प्रशांत यशवंत पाटील मुंबई, हनुमंत वाबळे पुणे, ज्ञानेश्वर अण्णा दळवी पुणे, अरुण पाटील मुंबई, श्रीकृष्ण भगत मलकापूर, डॉ. अमित दुखंडे मुंबई, आदेश कांडेलकर, योगेश कोकाटे तथा राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -