
यंदाच्या रब्बीत अकोला जिल्ह्यात लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली असून, पीककर्ज वाटपाची स्थितीसुद्धा चांगली राहली. हंगामात यंदा सुमारे ९० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण ६० कोटी उद्दीष्टापैकी ५४ कोटी रुपये वाटप करण्यात बँकांना यश मिळाले
अकोला : यंदाच्या रब्बीत अकोला जिल्ह्यात लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली असून, पीककर्ज वाटपाची स्थितीसुद्धा चांगली राहली. हंगामात यंदा सुमारे ९० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण ६० कोटी उद्दीष्टापैकी ५४ कोटी रुपये वाटप करण्यात बँकांना यश मिळाले. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापर्यंत रब्बी लागवड जेमतेम ४० टक्के झाली होती. नंतर मात्र, वेगाने लागवड झाली. त्यामुळेच जिल्ह्यात हरभरा, गहू लागवड नियोजित क्षेत्रापेक्षा १०० टक्के क्षेत्रावर झाली आहे. हेही वाचा - बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप यापैकी हरभरा काढणीचा हंगामही सुरू झालेला आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी नियोजनानुसार साडेसात हजार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वितरण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. बँकांनी ऑक्टोबरपासून पीककर्ज वाटप सुरू केले. त्यामुळे हंगामात ७५०० शेतकऱ्यांपैकी ५७०० शेतकऱ्यांना ५४ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले, अशी माहिती लिड बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया यांनी व्यक्त केला. हंगामात यंदा सरासरी १७२०५ हेक्टरच्या तुलनेत १९४५० हेक्टरवर गव्हाची लागवड झाली आहे. हेही वाचा - मन हेलावून टाकणारी घटना; मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर तर हरभऱ्याची ९० हजार हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १०४ टक्के म्हणजेच ९३५१४ हेक्टरवर लागवड झाली. पीककर्ज माफीमुळे कर्जखाती निल झाल्याने रब्बीत पीककर्ज वाटपाला गती मिळाली. त्यामुळेच हंगामात ९० टक्के पीक कर्ज वाटप होऊ शकले.
|
|||||||