कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; २६८ नवे पॉझिटिव्ह

Akola News Another dies due to corona; 268 new positives
Akola News Another dies due to corona; 268 new positives

अकोला :  कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी एका रुग्णाचा शुक्रवारी (ता. २६) मृत्यू झाला. याव्यतिरीक्त सकाळ, सायंकाळच्या अहवालासह रॅपिडचा अहवाल मिळून २६८ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.

मृत्यूमुखी पडलेले पुरूष रूग्णाचे वय ६८ होते. ते तळेगाव ता. तेल्हारा येथील रहिवाशी होते. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २६) १ हजार ३०० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७२ अहवाल निगेटिव्ह तर २२८ अहवाल पॉझिटिव्ह आले.

याव्यतिरीक्त रॅपिड ॲंटीजेन चाचण्यात सुद्धा ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या २६८ झाली. याव्यतिरीक्त दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, स्कायलार्क येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन तर हॉटेल रिजेन्सी येथील पाच जणांना असे एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
-------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १५३९२
- मृत - ३६३
- डिस्चार्ज - ११८८८
- ॲक्टिव्ह रूग्ण - ३१४१

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com