Akola News Attempted suicide attempt to recover electricity bill
Akola News Attempted suicide attempt to recover electricity bill

खळबळजनक; वीज बिल वसुलीच्या जबरदस्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न

हिवरखेड (जि. अकोला) : महावितरणमार्फत सक्तीने इलेक्ट्रिक बिल वसुली होत आहे. विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करणे सुरू असल्याने गोर्धा येथील एका इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील महावितरण अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील अनेक वीज ग्राहकांची देयके मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत. मागील वर्षी लागलेल्या २२ मार्चनंतरच्या लॉकडाउनपासून आतापर्यंत अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्यामुळे सामान्य जनता प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेली आहे.

अशात वीज बिल पूर्ण अथवा अर्धेमाफ होईल अशी आशा जनतेला लागली होती. त्यामुळे बहुतांश लोकांनी बिल भरले नव्हते. आता मागील बिलावर एवढ्या दिवसाचे व्याज व बिल वसूल करण्याकरिता मार्च अखेर असल्याचे कारण दाखवून या परिसरात पोलिसांना हाताशी धरून पठाणी वसुली करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - अजितदादा दिलेले आश्वासन पाळणार का?

चार दिवसांपूर्वी महावितरणचे पथक उपअभियंता कुमार यांच्या नेतृत्वात वीज बिल वसुलीसाठी गोर्था येथे गेले असता एका व्यक्तीला वीज बिल भरण्यासाठी सक्ती केली. विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे फर्मान सोडले. सदर व्यक्तीने माझ्याकडून सक्तीने वीज बिल वसूल केल्यास अथवा वीज पुरवठा खंडित केल्यास मी फाशी घेऊन आत्महत्या करेल असे सांगितले.

परंतु त्याच्या पोकळ धमक्या आहेत असे समजून महावितरणचे कर्मचाऱ्याने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढणे सुरू केले. शेवटी हतबल झालेल्या व्यक्तीने थेट विद्युत खांबा जवळच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या पत्नीने एकच टाहो फोडल्याने काही लोकांनी त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि पुढील अनर्थ टळला.

शेवटी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित न करता कर्मचाऱ्याला खाली उतरावे लागले. नंतर महावितरण पथकाने हिवरखेड पोलिस स्टेशनला धाव घेऊन ठाणेदारांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवरखेड पोलिस स्टेशनचे पथक गोर्धा येथे पोहोचले. सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य बैठक पार पडली. यावेळी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर सदर व्यक्तीने पैशांची कशीतरी जुळवाजुळव करून अर्धे वीजबिल भरल्याची माहिती मिळाली.

 

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com