This canal of Pimpalgaon Joga Dam has half TMC of water 
अहिल्यानगर

आवर्तनाच्या प्रतीक्षेत डोळे पाणावले; पिके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील सुमारे 11 गावांना वरदान ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्याला आवर्तन सुटेल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. अद्याप आवर्तन न सुटल्याने लाखो रुपये खर्च केलेली शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे हा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरत आहे. 

पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्यातून सुमारे 12 हजार 316 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जुन्नर व पारनेर या दोन तालुक्‍यांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्‍यातील सात हजार 127 हेक्‍टर व पारनेर तालुक्‍यातील पाच हजार 189 हेक्‍टर शेती ओलिताखाली येते. दहा फेब्रुवारीला या कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. ते सुमारे दोन महिने सुरू होते. मात्र, पुणेकरांनी पाणी पारनेरला येऊच दिले नाही. या आवर्तनाचे सुमारे 10 टक्केसुद्धा पाणी पारनेर तालुक्‍यात आले नाही. या कालव्यावर वडझिरे, देवीभोयरे व कारखाना, असे तीन 'टेल टॅंक' आहेत.

फरार बोगस डॉक्‍टरला अटक
 
सध्या या कालव्यात अर्धा टीएमसी पाणी असूनही, केवळ कर्मचाऱ्यांचा ढिसाळपणा व राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला आहे. पिके जळून गेल्याने, आवर्तन सुटले तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मात्र आता भरून येणार नाही. धरणातील 7.83 टक्के पाणी आवर्तनासाठी सोडता येऊ शकते. मात्र, या कालव्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना असल्याने, हे पाणी पिण्यासाठीच सोडावे लागेल की काय, अशीही शंका उपस्थित होत आहे. 

श्रेयासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा 

पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. आता कालव्याला पाणी सोडण्याच्या श्रेयवादावरून आमदार नीलेश लंके व खासदार डॉ. सुजय विखे यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. कोणाच्या पाठपुराव्याने पाणी सुटते, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

पिंपळगाव जोगा धरण क्षमता (टीएमसी) 

एकूण पाणीसाठा- 8.310 
उपयुक्त पाणीसाठा- 3.890 
मृत पाणीसाठा- 4.420 
सध्या आवर्तनासाठी शिल्लक पाणीसाठा- 0.304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT