cobra
cobra esakal
अहमदनगर

नागपंचमी विशेष : कीटकनाशकांचा अतिवापर सापांच्या मुळावर!

सुनील गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : अधिकाधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतात मोठ्या प्रमाणात तणनाशके, कीटकनाशकांसह रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. परिणामी, शेतातील कीटकांचे जीवनचक्र बिघडले. शेतशिवारात आढळणारे साप, तसेच एकमेकांवर अवलंबून असलेले किडे, अळ्या, बेडूक व मुंगूस या जीवांची संख्या त्यामुळे घटत आहे. ही जैवसाखळी तुटत असल्याने निसर्गाचा समतोलही ढासळत आहे. ही चिंतेची बाब ठरत आहे.

निसर्गचक्र बिघडतंय; किडे, अळ्या, बेडूक, मुंगसांच्या संख्येत घट

शेतातील मातीत, पिकांवर विविध किडे-अळ्या असतात. काही किडे पिकांसाठी शत्रू, तर काही मित्र म्हणून काम करतात. पिकांवर किड्यांची संख्या वाढली, तर त्यांना भक्ष्य करत बेडूक त्यांच्यावर नियंत्रण आणतात. बेडूक व पिके नष्ट करणाऱ्या उंदरांचे नियंत्रण साप करतात. सापांचे प्रमाण वाढल्यास मुंगसे त्यांना आपला आहार बनवितात. अशाप्रकारे जैवसाखळी चालते. मात्र, आधुनिक शेतीच्या नावाखाली व अधिक उत्पादनाच्या लालसेपोटी कीटकनाशकांचा अतिवापर सुरू झाला. त्यामुळे शेतातील किडे व अळ्यांमध्ये विष भिनले. त्यांना भक्ष्य करणारे बेडूक नष्ट होऊ लागले. परिणामी, सापाचा मुख्य आहार नष्ट झाला. सापही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कीटनाशकरूपी विष प्राशन करीत असल्याने, मृत्युमुखी पडू लागले. सध्या शेतशिवारात सापांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाग, सापांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. शेतकरी आता वर्षातून दोन-तीन वेळा पिके घेतात. त्यावर सतत कीटकनाशकांचा मारा सुरू असतो. त्यामुळे शेतातील कीटकरूपी खाद्य आणि पाणीसुद्धा रसायनयुक्त व विषारी झाले आहे. शेतशिवार सापांसाठी प्रतिकूल झाल्याने त्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे वळला आहे. अनेकदा भक्ष्याच्या शोधात साप घरात शिरतात. त्यामुळे ते मानवासाठी घातक ठरत आहेत.

ही कसली श्रद्धा?

नागपंचमीला मोठ्या श्रद्धेने नागदेवतेची पूजा होते. दुसरीकडे, साप दिसला की दगड-काठ्यांनी त्यास ठेचून मारले जाते. एकीकडे नागदेवतेच्या मूर्तीची पूजा करायची आणि दुसरीकडे जिवंत सापाला मारायचे. ही कसली श्रद्धा, असा सवाल निसर्गप्रेमी करीत आहेत.

दूध हे सापाचे अन्न नाही. मात्र, भुकेला साप पाणी समजून दूध पितो. ते न पचल्यामुळे चोवीस तासांत त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंधश्रद्धेपोटी नागपंचमीला कोणीही नागाला दूध पाजू नये. - प्रा. डॉ. यशवंत आहेर, प्राणिशास्त्र विभागप्रमुख, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT