Learn the history of Ghodegaon in Nevasa taluka which was earlier called Nipani Wadgaon
Learn the history of Ghodegaon in Nevasa taluka which was earlier called Nipani Wadgaon 
अहमदनगर

एका विहीरीमुळे बदलेले गावाचे नाव; नगर जिल्ह्यातील ‘हे’ गाव म्हणून आहे देशात प्रसिद्ध

अशोक मुरुमकर

अहमदनगर : म्हैशीचा बाजार भरणारे गाव म्हणून नेवासे तालुक्यातील घोडेगावची ओळख देशात आहे. येथे महाराष्ट्रासह विविध राज्यातून व्यापारी येतात. या गावाच्या नावाची रंजक कहाणी आहे. 

तशी अनेक गावांची नावे ही तेथील नागरिकांचे अडनाव किंवा व्यवसायावरुन पडलेले असते. मात्र घोडेगावचे तसं झालं नाही. कदाचीत नावावरुन अनेकांना वाटत असेल की, येथे घोडेगावकर अडनावाचे नागरिक असतील. घोडेगावमुळे येथे घोडेबाजार भरत असेल असंही अनेकांचा समज असेल. परंतु येथे तसंही नसून उलठ खूप मोठा विरोधाभास आहे. हे घोडेगाव असले तरी येथे म्हैशींचा बाजार खूप मोठा भरतो आणि म्हणूनच हे गाव प्रसिद्ध झालं. या गावाचे नाव १००० वर्षापूर्वी दुसरेच होते.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घोडेगाव अहमदनगर जिल्ह्यात नगर- औरंगाबाद महामार्गावर १७ ग्रामपंचायत सदस्य असलेले हे गाव आहे. दर शुक्रवारी येथे म्हैशींचा मोठा बाजार भरतो. त्यासाठी विविध ठिकाणाहून शेतकरी व व्यापारी येतात. यातून मोठी उलाढाल येते होते. येथील म्हैशीच्या किंमतीवरुन अनेकदा बातम्या झाल्या आहेत. लाखो रुपयांपर्यंत खरेदी- विक्री येथे होते. पण घोडेगावात म्हैशींचा बाजार कसा, असे अनेकजण प्रश्‍न करतात. मुळात या गावाच्या नावालाच एक इतिहास आहे. या घोडेगावचे नाव ‘निपाणी वडगाव’ होते. निपाणीवरुन हे नाव का पडेल असेल असा थोडासा अंदाज येतो. कारण या गावात नेहमी पाणी टंचाई निर्माण होत होती. 

हेही वाचा : वेळ जाईल म्हणून टेम्पोतच कामगारांनी शिदोरी सोडली... थोड्या वेळातच पहिल्यादाच टेम्पोत बसलेला अभियंताही...
लोकांना पाणी टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसे. त्या काळात गावात पाण्याची खूप बिकट परिस्थिती निर्माण होतहोती. पाण्याच्या शोधासाठी गावातील नागरिकांना भटकंती करावी लागत होती. तेव्हा येथे ६०- ७० घरांचेच हे गाव होते. या गावाच्या नावाबद्दल अधिकृत कोणाला सांगता येत नाही. या गावातील नागरिक पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी एकत्र आले. सर्वांनी मिळून श्रमदानातून एक विहीर खोदण्याचे ठरवले. 
गावचा पाणी प्रश्‍न मिटणार आणि आपली भटकंती थांबणार ये आशाने सर्व गावकऱ्यांनी खूप मेहनतीने १० परस विहीर खांदली. परंतू विहिरीला एक थेंबही पाणी लागले नाही. ऐवढी मेहनत घेऊन सुद्धा पाणी न लागल्याने गावकरी निराश झाले. त्यानंतर त्यांनी विहिर खोदण्यांचा नाद सोडून दिला. पण काही दिवसानंतर एका साधूने गावाकऱ्यांना विहीर खोदण्यास सांगितले. तेथे नक्की पाणी लागेल असे सांगीतले. 

त्यानंतर विहीर खोदण्याचे काम सुरु झाले. साधारण सहा परस या विहीरीचे खोदकाम झाले. तरी पाणी लागले नाही. त्यामुळे पुन्हा या विहिरीचे काम व्यर्थ जाते की काय आसे गावाकाऱ्यांना वाटू लागले. काम सुरु असतांनाच एका मंगळवारी सहा परसाच्या पुढे आचानक एक अश्वरूपी दगडाची मूर्ती सापडली. ही मुर्ती कशाची व ती येथे कशी आली हा प्रश्न गावकऱ्यांना पडला. त्याचरात्री गावच्या पाटलाला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक देवी आली व म्हणाली, मी घोडेश्वरी देवी आहे. 

हेही वाचा : अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम; ‘या’ धरणात ऐवढा पाणीसाठा
माझी प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानीच्या मंदिरात करा. यापुढे या गावातील लोकांना पाणी कमी पडणार नाही व गावची कीर्ती सर्वदूर पसरेल. असा दृष्टांत देवून देवी अंतर्धान (गुप्त) पावली. दुसऱ्या दिवशी पाटलांनी गावातील लोकांना रात्रीचे स्वप्न सांगितले. त्याप्रमाणे घोडेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानी मंदिरात रेणुका मातेच्या शेजारी केली. त्यानंतर त्या विहिरीचे काम केल्यानंतर विहिरीस भरपूर पाणी लागले, अशी अख्यायीका आजही येथे सांगितली जाते. 

घोडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर वैरागर म्हणाले, येथे पूर्वी पाण्याची टंचाई होती. त्यातून येथे विहीर खोदण्यात आली. आजही ती विहीर या गावात आहे. तीचे जतन करुन कठाडे बांधण्यात आले आहे. या विहीरीतील पाणी पिण्यास गोड होते. या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात, असे सांगितले जात. अश्वरूपी घोडेश्वरी देवीची मूर्ती सापडल्यानंतर देवीच्या कृपेने गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटल्यामुळे या निपाणी वडगावचे नाव घोडेगाव असे पडले. घोडेश्वरी देवीची मुर्ती स्वयंभु असून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी म्हणजे मोठमोठ्या दगडांनी बनवलेले आहे.

घोडेगावचा म्हैस बाजार प्रसिद्ध
पत्रकार सुनिल गर्जे
म्हणाले, नेवासे तालुक्यातील घोडेगाव हे औरंगाबाद- नगर रस्त्यावर आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १९ हजाराच्या दरम्यान आहे. या गावाच्या नावाची एक रंजक अख्यायिका सांगितली जाते. हे गाव म्हैसच्या बाजारामुळे देशात प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे व्यापारी व शेतकरी म्हैस घेण्यासाठी व विकण्यासाठी येतात. त्यातून मोठ्याप्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळतो. मात्र सध्या कोरोनामुळे हा बाजार बंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT