Akola Corona News A curfew throughout the day on Sunday and every night 
अकोला

धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपूर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करताना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
पुढील येणाऱ्या प्रत्‍येक रविवारी संपूर्ण दिवसभर संचारबंदी असेल. शनिवार रात्री ८ ते सोमवारचे सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. या कालावधीत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करता येणार नाही. रात्रीची संचारबंदी- संचारबंदीच्‍या आदेशाचे पालन करताना कुठल्‍याही व्‍यक्‍ती, नागरिकांना हालचाल करण्‍याकरिता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता पुढील आदेशापर्यंत लागू करण्‍यात आले आहेत.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

संचारबंदीत याबाबींना सुट

  • - शासकीय तसेच खाजगी अॅम्‍बुलन्‍स सेवा.
  •  रात्रीच्‍या वेळेस सुरू राहणारी औषधांची दुकाने.
  •  ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी.
  •  रेल्‍वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्‍हेट लक्‍झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्षा.
  • हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे.
  • एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योग.
  • या आठवड्यात भरविण्‍यात येणारे सर्व आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
  • लग्‍नसंमारंभाकरिता केवळ ५० व्‍यक्‍तींनाच उपस्थित राहता येईल.
  • लग्‍नसमारंभाकरिता रात्री ८ वाजेपर्यंतच खालील नमूद केल्‍याप्रमाणे परवानगी अनुज्ञेय राहील.
  •  महानगरपालिका क्षेत्राकरिता उविभागीय अधिकारी, ग्रामीण भागाकरिता तहसीलदार, नगर परिषद क्षेत्राकरिता- मुख्‍याधिकारी नगर परिषद यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.
  • - लग्‍न समारंभाचे ठिकाणी सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक राहील.
  • - चारचाकी वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व ३ व्‍यक्‍ती व ऑटोरिक्‍शा वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व २ सवारी यांनाच परवानगी राहील.
  • - सर्व प्रकारची आस्‍थापना, दुकाने, बाजारपेठ, बार, हॉटेल, सिनेमागृह, मनोरंजन उद्याने इत्‍यादी सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुरू राहतील.
  • - जिल्ह्यामधील सर्व शाळा व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खालगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस ता.२८ फेब्रुवारी २०२१पर्यंत बंद ठेवण्‍यात येत आहेत.


आणखी २३५ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे ८१४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५७९ अहवाल निगेटीव्ह तर २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सकाळी ४९० तर सायंकाळी ३२४ अहवाल प्राप्त झाले. त्यात सकाळी प्राप्त अहवालानुसार १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सायंकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सध्या जिल्ह्यात १४०७ जणांवर उपचार सुरू आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT