Akola Corona News The number of corona active patients is 1 thousand 31 
अकोला

बेफिकीरी अंगलट; कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या झाली १ हजार ३१

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सतत वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसमोर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडत असतानाच ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यामुळे मंगळवारी (ता. १६) जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सप्टेंबर २०२० नंतर आता प्रथमतः एक हजारावर जावून पोहचली. यासह रूग्णसंख्येनेही १५९ चा चौथा नवा उच्चांक गाठल्याने कोरोनाचे संकट वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर २०२० या महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर झाले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ६० वर जावून पोहचली होती. कोरोना मृत्यूचा दर सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर २०२० या महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली होती. त्यानंतरच्या महिन्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर नव्हती. परंतु आता कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

मंगळवारी आढळले १५९ नवे रूग्ण
कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १६) ४९२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३३३ अहवाल निगेटिव्ह तर १५९ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी १५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ५९ महिला व ९५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील २९, अकोट येथील १४, गीता नगर, तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, रवी नगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, जीएमसी व डोंगरगाव येथील प्रत्येकी चार व इतर भागारीत रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यात जीएमसी येथील तीन तर गुलशन कॉलनी येथील दोन याप्रमाणे रहिवाशी आहे. याव्यतिरीक्त ९९ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्‍यात आला.

हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाने असा गाठला उच्चांक
कोरोना विषाणू संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांनी सप्टेंबर २०२० या महिन्यात उच्चांक गाठला होता. या महिन्यात १३ सप्टेंबर रोजी २३२ रूग्ण आढळले होते. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी २१० तर १७ सप्टेंबर रोजी सकाळी २०६ रूग्ण आढळले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या १६ तारखेलाच १५९ रुग्ण आढळल्याने या दिवस रुग्णवाढीचा तिसरा उच्चांकी दिवस ठरला.

बाजारात गर्दी; जमावबंदीचा फज्जा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवार (ता. १५) पासून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानंतर सुद्धा मंगळवारी (ता. १६) महानगरातील बाजारात नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. भाजी बाजारासह इतर दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने आदेशानंतर पहिल्याच दिवशी जमावबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

हेही वाचा - तीस वर्षांपासून रक्तपुरवठा करीत तरुणाला दिले जीवदान!

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १२६६४
- मृत - ३४४
- डिस्चार्ज - ११२८९
- ॲक्टिव्ह रूग्ण - १०३१

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT