Akola Marathi News: 64,000 students will get free uniforms
Akola Marathi News: 64,000 students will get free uniforms 
अकोला

६४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून मोफत गणवेश वाटप सुरू करण्यात येणार आहे.

मोफत गणवेश वाटप योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थिनी (मुली) तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी (मुले) तसेच दारिद्र्यरेषेखालील पाल्यांची मुले अशा एकूण जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत.

त्यामुळे जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रत्येकी एकच गणवेश वितरीत करण्यात येणार आहे. गणवेश खरेदीसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत.

त्यानुषंगाने शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT