Akola Marathi News Due to changing lifestyle, the risk of stomach cancer is increasing 
अकोला

धोका वाढतोय; बदलत्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला होऊ शकतो हा भयानक आजार!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना सतत धावपळ करावी लागते. यामुळे बऱ्याच तरुणांच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात किंवा त्यांच्याकडून एकाच वेळी अतिप्रमाणात खाल्लं किंवा पेय घेतली जातात. बरेच जण नियमितपणे बाहेरचे अन्नपदार्थ खातात. जीवनशैलीतील या बदलांमुळे १८ ते ४० या वयोगटातील बऱ्याचशा व्यक्तींमध्ये जठराच्या समस्या वाढत चालल्या आहेत. गेल्या दशकभरात पोटाच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र आम्हाला दिसत आहे.

भारतात पुरुषांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये पाचव्या आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सातव्या स्थानावर जठराचा कर्करोग आहे. त्यामुळे जठाराच्या कर्करोगाचा धोका वाढत असून या रोगासंदर्भात घ्यायची काळजी व जागरूकता वाढावी यासाठी नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट उरो-ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉ. अश्विन ताम्हणकर आणि कन्सल्टन्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (गॅस्ट्रो-इंटेस्टीनल ऑन्कोलॉजी आणि एचपीबी ऑन्कोलॉजी) डॉ. राजेश शिंदे यांनी स्थानिक ऑर्चिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सल्ला देत कॅन्सर उपचारांमधील आधुनिक सुधारणा आणि गॅस्ट्रो व उरो कॅन्सर उपचारांमध्ये रोबोटिक सर्जरीची भूमिका याविषयी माहिती दिली.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

मूत्रसंस्थेच्या कर्करोगांवरील उपचारांमधील विकासावर प्रतिक्रिया देताना डॉ. अश्विन ताम्हणकर यांनी सांगितले की मूत्रमार्गाच्या (युरॉलॉजिक) कर्करोगांमध्ये मूत्रपिंडातील जखमा, किडनी, मूत्राशय, पुरुषांचे जननेंद्रीय, अंडकोष आणि मूत्रमार्गाच्या कर्करोगाचा समावेश होतो. कर्करोगांवरील अलीकडील शास्त्रक्रियां व्यतिरिक्त आम्हां ऑन्कोलॉजिस्टसना असे ठामपणे वाटते की प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजी महत्त्वाची आहे

आणि कर्करोगाचे लवकरात लवकर निदान केले जाणे अतिशय गरजेचे आहे. पीएसए स्क्रीनिंग आणि इतर स्क्रीनिंग पद्धतींसारख्या विविध रोगनिदान पद्धतींच्या मदतीने आम्ही कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करू शकू, असा विश्वास त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केला. जठराच्या कर्करोगांवरील उपचाराबद्दल माहिती देताना डॉ. राजेश शिंदे यांनी सांगितले की ‘भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये पाचव्या आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सातव्या स्थानावर जठराचा कर्करोग आहे.

भारतात या कर्करोगाचे, खास करून मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त असल्याने उपचारांच्या विविध पद्धतींवर भर देणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि रोबोटिक शस्त्रक्रिया यांचा समावेश होऊ शकतो. या कर्करोगांचे सुरुवातीच्या टप्प्यात यांचे निदान झाल्यास रुग्णांची त्यातून सुटका होऊ शकते. नियमितपणे तपासणी करत राहण्याबरोबरीनेच निरोगी, संतुलित आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

भाज्या, अख्खी धान्ये यांचा आहारात समावेश केल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो. भाज्या व धान्यांमध्ये जीवनसत्त्वे, क्षार, फायबर आणि प्रतिजैविके असतात ज्यामुळे आपले जठर व आतडे निरोगी राहते, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील रुग्णांना विशेष सल्ल्याचा लाभ मिळावा यासाठी डॉक्टर्स दर महिन्याला अकोल्यातील रुग्णालयांना भेटी देणार आहेत, अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT