Akola Marathi News Increased risk of bird flu; Vigilance zone declared at four places, awaiting report of samples
Akola Marathi News Increased risk of bird flu; Vigilance zone declared at four places, awaiting report of samples 
अकोला

बर्ड फ्लूचा धोका वाढला; चार ठिकाणी सतर्क क्षेत्र घोषित, नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार ठिकाणी मृत पक्षी आढळल्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर मृत पक्षांचे नमने रोग अन्‍वेषण विभाग, पुणे यांचे मार्फत राष्‍ट्रीय उच्‍च सुरक्षा पशुरोग संस्‍था, भोपाळ येथे पाठविण्‍यात आले आहेत. या नमुन्‍यांचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत संबंधित क्षेत्रास सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.


घोषित केलेल्या सतर्क क्षेत्रात मौजे हातगाव (ता. मूर्तिजापूर) येथील राम हिंगणकर यांचे निवासस्‍थान, मौजे चाचोंडी (ता. अकोला) येथील डॉ. चिकटे यांचे पोल्ट्री फार्म, चोरवड (ता. अकोट) येथील बाळू पोटे यांचे पोल्ट्री फार्म व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवास स्थान या क्षेत्रांचा समावेश आहे. घोषित क्षेत्रापासूनचे १० कि.मी. त्रिज्‍येमधील क्षेत्र सतर्क क्षेत्र म्‍हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

हेही वाचा - शहरातील सर्व दवाखान्याचे होणार फायर ऑडिट

उपाययोजना सुरू
सतर्क क्षेत्र म्‍हणून जाहीर करण्‍यात आलेल्या प्रभावित क्षेत्रातील परिसरामध्‍ये उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २ टक्‍के सोडियम हायड्रोक्‍साईड किंवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्री फार्ममध्‍ये काम करणाऱ्या व्‍यक्‍तींनी चेहऱ्यावर मास्‍क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वापरण्‍यात आलेल्‍या मास्‍क तसेच हातमोजांची योग्‍यप्रमाणे विल्‍हेवाट लावण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्ममध्‍ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्‍या आवश्‍यक त्‍या सर्व नेांदी अद्ययावत व व्‍यवस्थित ठेवण्‍यात याव्‍यात,असे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - राज्य शासनाच्या आदेशाने महानगरपालिकेतील तीन वर्षातील ठराव गोळा करण्याची लगबग सुरू

...तर होईल शिक्षा
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास याद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT