Akola Marathi News Preparations to start classes 5th to 8th, teachers, staff to be corona test 
अकोला

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

कृष्णा फंदाट

तेल्हारा (जि.अकोला) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून पाचवी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांची तसेच कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाकडून नियोजन केले आहे.


मार्च २०२० पासून कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहे. सत्र २०२०-२१ मध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अध्ययन, अध्यापन सुरू झाले. दहावी, बारावीची बोर्ड सर्टिफिकेट परीक्षा असल्याने ता. २३ नोव्हेबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष शिक्षनासाठी सुरू करण्यात आले.

आता ता. २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांनी शालेय व्यवस्थापन करत असताना सोशल डिस्टन्सिन कसे ठेवायचे, मास्क, वर्गखोल्यांची स्वच्छता हॅँडवॉश आदीबाबत देखील सूचना देण्यात आले आहेत.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
 
यापूर्वी चाचणी झालेल्यांना सुट
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटी पीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी ज्यांच्या चाचण्या झाल्या त्यांना चाचणी करण्याची गरज नाही. पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्यांना शाळेत प्रवेश नसेल. नियमांचे पालन करून ता.२७ जानेवारीला प्रत्यक्ष वर्ग सुरू करायचे असल्याने मुख्याध्यापकांनी सुयोग्य नियोजन करावे, अशा प्रकारचे सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
 
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग ता.२७ जानेवारीला सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शासन व जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
- देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी, माध्य., अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

Morning Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त नाश्ता बनवायचा असेल तर मुगापासून बनवा हा खास पदार्थ, अगदी सोपी आहे रेसिपी

Shiva Shakti Temple: भारताची एकमेव जागा जिथे शिव आणि शक्ती एकत्र दर्शन देतात, कुठे आहे हे पवित्र स्थळ पहा

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

SCROLL FOR NEXT