Akola Marathi News Zilla Parishad 19 teachers became contract 
अकोला

जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक झाले कंत्राटी, वाचा काय असेल कारण

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले, अनुसूचित जामातीचा दावा साेडलेल्या नियमित शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने अर्थात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यरत करण्यासाठीच्या (अधिसंख्य पदावर वर्ग करणे) प्रक्रियेअंतर्गत प्रलंबित ठेवलेल्या १९ प्रकरणात सुद्धा जिल्हा परिषदेमार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या १७१ झाली असून यापूर्वीच १५२ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती.

सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेवर ६ जुलै २०१७ राेजी निर्णय दिला हाेता. त्यानुसार मागास जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत रूजू झालेल्या आणि त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ राेजी आदेश जारी करून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.

त्यानुसार जिल्ह्यातील १७१ शिक्षक अधिसंख्य होते. संबंधित शिक्षकांपैकी १५२ शिक्षकांवर गत आठवड्यातच कारवाई करण्यात आली. परंतु काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली होती. परंतु सोमवारी (ता. ४) प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आलेल्या शिक्षकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेते एकूण १७१ शिक्षकांना अधिसंख्य केले आहे.

शिक्षकांना मिळणार नाही लाभ
अधिसंख्य पदांवर शिक्षकांना नियुक्ती केल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना नियमित सेवेतून मिळणाऱ्या पेंशन, ग्रॅन्युएटीसह अन्य लाभांपासून मुकावे लागणार आहे. तसेच सेवेचीही तुलनेने शाश्वतीही राहणार नसल्याची माहिती आहे.

(संपादन - वि्वेक मेतकर)

 

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT