Akola News: Lohar community wanders from village to village to fill their stomachs
Akola News: Lohar community wanders from village to village to fill their stomachs 
अकोला

पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार समाजाची गावोगाव भटकंती

संतोष अवसरमोल

घाटबोरी (जि.वाशीम) : विकासापासून कोसोदूर असलेल्या मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी जालना जिल्हातून भाटीपुरामधून आलेले लोहार समाज भटकंती करत-करत आहे. घाटबोरीमध्ये उघड्यावरच त्यांनी व्यवसाय थाटला आहे.


शेतकऱ्यांच्या शेती अवजारांना आकार देणारे लोहार कारागीरांच्या हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष सुरू आहे. राम पवार, अशोक पवार व पत्नी मिना अशोक पवार, अल्प मजुरीतही काम करून दिवस आढत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या समाजाला उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे लोहार समाज विकासापासून दूर आहे. उपजिविकेच्या व्यवसायावरच यांत्रिकीकरणाचे आक्रमण झाल्यामुळे या समाजाला आता उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जीवनाचा अतिशय खडतर प्रवास या समाजाच्या वाट्याला आला आहे.

यावर मात करीत घाम गाळून रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाच्या व्यवसायावर लोखंड आणि बिड धातूचे भाव वधारल्यामुळे व कोरोनाच्या संकटामुळे या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजाची भटकंती आजही कायम असून, विकासाच्या प्रवाहापासून हा समाज कोसोदूर आहे.

निरक्षर व अठराविश्वे दारिद्र्यात खीतपत पडलेल्या या समाजाचा व्यवसाय पूर्णत: शेती व्यवसायाशी निगळीत आहे. आधुनिकीकरणातत शेतीसुद्धा यांत्रिक होत आहे. याचाच परिणाम लोहार समाजबांधवावर बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे लोहार समाज आर्थिक संकटात सापडला आहे.

अनेक गावात शेतीशी निगडीत अवजारे तयार करून देण्याचे काम लोहार समाज बांधव करतात. शेती व्यवसायाला लागणारे फास, विळा, पावशी, कुऱ्हाड, नागराची फाड, वखराची फास, खुरपी आदी लोखंडी अवजारे बनवून उपजिविका करण्याचे काम या समाजाच्या वाट्याला आले आहे. वखरणी व नांगरणीसाठी लागणारी अवजारे शेतकरी लोहारांकडून क्वचितच विकत घेतात. शासनाने समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याने, सामाजिक संस्थानी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

लोहार समाज कोरोनाच्या संकटामुळे पूर्णपणे खचला आहे. शासनाने अन्न-धान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा लोहार-सुतार समाजातील गरजू बांधवांना करण्यात यावा. या समाजाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विकासापासून कोसोदूर असून, शिक्षणापासून वंचित आहे. या कारागिरांमधील कला जिवंत ठेवण्यासाठी व लोहार समाजाची आर्थिक अडचन दूर करण्यासाठी, अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे.
- भाई कैलास सुखधाने, राज्य सरचिटनीस, भिमशक्ती, मेहकर

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT