Akola News Remedial injections available at cheaper rates 
अकोला

रेमडिसिवर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध

सकाळ वृत्तसेेवा

अकोला   जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल तसेच नॉन कोविड हॉस्पीटल येथे आरटीपीसीआर (कोविड चाचणी) केल्यानंतर रेमडिसिवर इजेक्शन दिल्या जाते. खासगी रुग्णालयांमध्ये हे इजेक्शन ४ हजार ५०० रुपये ते ५ हजार प्रति व्हायल या प्रमाणे विकल्या जाते. यामुळे रुग्णाला आर्थिक भुदंड होतो. परिणामी डिस्ट्रीक्ट टास्क कमिटीच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रेमडिसिवर इंजेक्शन एक हजार दोनशे रुपये यादराने स्वस्त मेडिकल स्टोअर किंवा जनेरिक मेडिसीन स्टोअरमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी गरजूनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररूममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभीय, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, आदि उपस्थित होते.
-----------
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या सूचना
- महानगरपालिका व ग्रामीण भागात संपर्कातील व्यक्तीचे शोध घेवून हाय रिक्स असलेल्या व्यक्तींच्या कोविड चाचण्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली.
- कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिसरातील किमान शंभर व्यक्तीच्या चाचण्या करण्याचे निर्देश दिले.
- जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करून अनावश्यक घराबाहेर जावू नये, प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
- होम आसोलेशन सद्यास्थिती, आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबत यावेळी आढावा घेतला. होमआयसोलेशन नियमाचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
- सामाजिक अंतर, मास्क लावणे व साबणने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे तसेच लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी न करता कोविन ॲपवर नोंदणी करून आपला वेळ निश्चित करुनच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT